24.4 C
Latur
Thursday, August 18, 2022
Homeमहाराष्ट्रअविनाश भोसले यांचे हेलिकॉप्टरही सीबीआयकडून जप्त

अविनाश भोसले यांचे हेलिकॉप्टरही सीबीआयकडून जप्त

एकमत ऑनलाईन

मुंबई : पुण्यातील उद्योगपती आविनाश भोसले यांचे हेलिकॉप्टरही आज सीबीआयकडून जप्त करण्यात आले आहे. त्यामुळे येस बँक आणि डीएचएफएल गैरव्यवहार प्रकरणात अटकेत असलेल्या भोसलेंना सीबीआयकडून पुन्हा धक्का बसला आहे.

युनियन बँक ऑफ इंडियाच्या नेतृत्वाखालील १७ बँकांच्या कन्सोर्टियमला ३४,६१५ कोटी रुपयांचे नुकसान करणा-या डीएचएफएलच्या घोटाळ्यात त्याचा सहभाग असल्याचा आरोप अविनाश भोसले यांच्यावर आहे. त्यानंतर त्यांना सीबीआयने अटक केली होती. आज त्यांचे ऑगस्टा वेस्टलँडचे हेलिकॉप्टर आज सीबीआयकडून जप्त करण्यात आले आहे.

दरम्यान, भोसले यांना २६ मे रोजी अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना १० दिवसांची सीबीआय कोठडी सुनावण्यात आली होती. त्यांना पुन्हा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने भोसले यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर आज त्यांचे खासगी हेलिकॉप्टर जप्त करण्यात आले आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या