नाशिक : नाशिक शहरातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथील पंचवटी परिसरात बाप-लेकाने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
सध्या नाशिकसह जिल्ह्यात आत्महत्यांची मालिका सुरूच असून नाशिककरांना अस्वस्थ करणा-या या घटनांनी सामाजिक स्वास्थ्य बिघडत असल्याचे चित्र आहे. दरम्यान नाशिकमधील पंचवटी परिसरात दोघा बाप-लेकांनी आत्महत्या केली. जगदीश जाधव आणि प्रणव जाधव अशी दोघांची नावे आहेत.
दरम्यान राहत्या घरात गळफास घेऊन दोघांनी आत्महत्या केली असून जाधव यांनी आपल्या मुलाचा खून करून आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला असून ही बाप-लेकाची आत्महत्या परिसरात धक्का देणारी ठरली आहे. आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.