नाशिक : कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने सन २०२३ चा जनस्थान पुरस्कार ज्येष्ठ लेखिका आशा बगे याना जाहीर झाला आहे. दर दोन वर्षांनी साहित्य क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देणा-या साहित्यिकाला हा पुरस्कार दिला जातो. यंदा आशा बगे यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे.
१० मार्च २०२३ रोजी कालिदास कला मंदिरात पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. मराठी साहित्य क्षेत्रात हा पुरस्कार खूप महत्त्वाचा मानला जातो. कुसुमाग्रजांच्या नावाचा हा सन्मान मिळणे हे माझे भाग्य आहे, असे बगे म्हणाल्या.