पुणे : ठेवीदारांच्या कोट्यवधी रुपयांच्या फसवणूक प्रकरणात बांधकाम व्यावसायिक दीपक कुलकर्णी (डीएसके) यांना मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला.
त्यामुळे चार वर्षांहून अधिक काळ कोठडीत असलेल्या डीएसकेंना दिलासा मिळाला आहे. ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी डीएसके व त्यांच्या कुटुंबीयांना मार्च २०१९ मध्ये अटक करण्यात आली होती. या अगोदर त्यांचा जामीन सातत्याने फेटाळण्यात आला होता.