मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे पुत्र ऋषिकेश देशमुख यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. मुंबईच्या विशेष पीएमएलए कोर्टाने हा जामीन मंजूर केला.
यामुळे ऋषिकेश यांना मोठा दिलासा मिळाला आहे. शंभर कोटी रुपयांच्या कथित आर्थिक घोटाळ््या प्रकरणी हा जमीन मंजूर झाला आहे. सीआरपीसीच्या कलम ८८ अंतर्गत ऋषिकेश देशमुख यांनी जामीनासाठी अर्ज दाखल केला होता.