बजाज हे कोरोना किंवा मेडिकल एक्स्पर्ट नाहीत : देवेंद्र फडणवीस

354

कोविडसंदर्भात काय केले पाहिजे हे त्यांचे मत अंतिम सत्य असू शकत नाही

मुंबई : कोरोनाऐवजी केंद्र सरकारने अर्थव्यवस्थेचाच आलेख खाली आणल्याची टीका उद्योगपती आणि बजाज ऑटोचे व्यवस्थापकीय संचालक राजीव बजाज यांनी केली होती. यालाच विधानसभेचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

बजाज कुटुंब हे वाहन निर्मिती क्षेत्रातील तज्ज्ञ आहेत. ते आरोग्य क्षेत्रातील किंवा कोविडचे तज्ज्ञ नाहीत. त्यामुळे कोविडसंदर्भात काय केले पाहिजे हे त्यांचे मत अंतिम सत्य असू शकत नाही, असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी राजीव बजाज यांच्यावर निशणा साधला आहे. राजीव बजाज हे स्कूटर कशी बनवायला हवी होती, रिक्षा कशी बनवायला हवी होती किंवा कार कशी बनवायची यासंदर्भात बोलले असते तर ते अंतिम सत्य असू शकते.

Read More  दिल्लीच्या सीमा खुल्या, रेस्टॉरंट-मॉलही उघडणार

मात्र कोविडदरम्यान काय केले पाहिजे याबद्दल तुमचे किंवा माझे मत असू शकते तसच राजीव बजाज यांचे एक मत असू शकते, असे उत्तर फडणवीस यांनी दिले आहे. मला वाटते एखाद्या गोष्टीबद्दल प्रत्येक व्यक्तीला मत मांडण्याचा अधिकार आहे तसे मत बजाज यांनी मांडले आहे, असे फडणवीस म्हणाले आहेत.