19 C
Latur
Tuesday, November 29, 2022
Homeमहाराष्ट्रमुख्यमंत्री शिंदेंच्या कार्यक्रमात काळ्या कपड्यांवर बंदी

मुख्यमंत्री शिंदेंच्या कार्यक्रमात काळ्या कपड्यांवर बंदी

एकमत ऑनलाईन

मुंबई : एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत जात राज्यात नवीन सत्ता स्थापन केली. सत्तासंघर्षानंतर शिंदे- फडणवीस सरकार अनेक नियम, निर्णयांमध्ये बदल करताना दिसत आहेत. दरम्यान, शिंदे सरकारने अजब निर्णय घेतला असल्याची माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यक्रमात काळ्या रंगावर बंदी घालण्यात आली आहे. सध्या राजकीय वर्तुळात या अजब निर्णयाच्या चर्चेला उधाण आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार मीरा भाईंदर येथे लता मंगेशकर नाटयगृह इमारतीचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते हा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. दरम्यान, मुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यक्रमात काळे कपडे घालणा-यांना प्रवेश नसल्याचे सांगण्यात आले आहे. इतकचे नव्हे तर, काळा रुमाल, काळा पेन घेऊन येणा-यांवरही प्रवेश बंदी केली असल्याची माहिती समोर आली आहे.

राजकीय वर्तुळात शिवसेना कोणची याची लढत सुरू असताना या अजब निर्णयामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. शिवसेनेच्या शिंदे गटाने निवडणूक आयोगाला तीन चिन्हांचा पर्याय सादर केला आहे. श्.िांदे गटाने दिलेल्या पर्यायांपैकी निवडणूक आयोगाकडून तळपता सूर्य या चिन्हाला मंजूरी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सोमवारी, निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला शिवसेना- उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव आणि मशाल हे चिन्ह दिले. तर, शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना हे नाव दिले.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या