28.1 C
Latur
Sunday, October 2, 2022
Homeमहाराष्ट्रसाईमंदिरात हार-फुलांवर बंदी

साईमंदिरात हार-फुलांवर बंदी

एकमत ऑनलाईन

शिर्डी : कोरोनानंतर आता राज्यातल्या मंदिरांमध्ये हार-फुलं नेण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र शिर्डी संस्थानाने साईमंदिरात फुलं नेण्यास अद्यापही मनाई केलेली आहे. मंदिराच्या या भूमिकेला आता स्थानिक विक्रेत्यांनी आणि भाविकांनी आव्हान दिले आहे. यावेळी मंदिर परिसरात त्यांची सुरक्षारक्षकांसोबत झटापट झाली.

यावेळी मंदीर प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. संतप्त फूल विक्रेते आणि भाविकांनी यावेळी मंदिरात हार-फुलं नेण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांना सुरक्षारक्षकांनी अडवले आहे. साई संस्थानच्या या भूमिकेवर भाविक आणि विक्रेत्यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. त्यामुळे सुरक्षारक्षकांसोबत त्यांचा मोठा वाद झाला आणि दर्शनरांगही थांबली होती. अखेर सुरक्षारक्षकांनी त्यांच्याकडची हार-फुलं काढून घेतली आणि मगच त्यांना मंदिरात प्रवेश दिला.

या प्रकरणात राजकारण नको : सुजय विखे
हार फुलं आणि प्रसाद यांना मंदिरात परवानगी मिळावी, यासाठी ग्रामस्थ आणि विक्रेते गेल्या काही दिवसांपासून आंदोलन करत आहेत. मात्र त्याची दखल घेतली गेली नाही. याबद्दल भाजपा खासदार सुजय विखे पाटील यांनी या प्रकरणात मधला मार्ग काढण्याची मागणी केली आहे. विश्वस्त मंडळाने लोकप्रतिनिधी राधाकृष्ण विखे पाटलांना विश्वासात न घेता आपला निर्णय रेटण्याचा प्रयत्न केला. त्यामुळं हा गोंधळ उडाल्याचं सुजय विखे पाटलांनी सांगितले आहे. तसेच या प्रकरणात राजकारण न करण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या