29.8 C
Latur
Saturday, December 3, 2022
Homeमहाराष्ट्रराज्यातही पीएफआयवर बंदी; आदेश जारी

राज्यातही पीएफआयवर बंदी; आदेश जारी

एकमत ऑनलाईन

मुंबई : पॉप्युलर फ्रंड ऑफ इंडिया अर्थात पीएफआय या संघटनेवर केंद्राने नुकतीच पाच वर्षांची बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर केंद्रापाठोपाठ आता राज्य सरकारनेदेखील या संघटनेवर बंदी घालण्याचा आदेश जारी केला आहे. केंद्र सरकारच्या अधिसूचनेनंतर महाराष्ट्र सरकारने जारी केलेल्या आदेशात पीएफआय आणि त्याच्या सहयोगी किंवा संलग्न संस्था बेकायदेशीर संघटना म्हणून घोषित करत असल्याचे घोषित केले आहे.

पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या ट्विटर अकाउंटवर बंदी घालण्यात आलीय. केंद्रीय गृह मंत्रालयानं पीएफआयवर ५ वर्षांच्या बंदीनंतर ही कारवाई केली. भारत सरकारच्या तक्रारीनंतर ट्विटर इंडियाने पीएफआयच्या खात्यावर बंदी घातली आहे.

केंद्र सरकारने २८ सप्टेंबर रोजी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियावर बंदी घातली. अनेक राज्यांनी पीएफआयवर बंदी घालण्याची मागणी केली होती. त्यानंतर एनआयए, सर्व राज्यांचे पोलीस आणि एजन्सींनी पीएफआयच्या कार्यालयावर छापे टाकले आणि शेकडो लोकांना अटक केली. केंद्रीय गृह मंत्रालयानं पीएफआयला ५ वर्षांसाठी प्रतिबंधित संघटना म्हणून घोषित केलं. पीएफआय व्यतिरिक्त ८ संलग्न संस्थांवरही कारवाई करण्यात आली.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या