मुंबई : विधिमंडळाचा उल्लेख चोर असा केल्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत अडचणीत सापडले आहेत. विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात त्यांच्याविरोधात हक्कभंग आणण्यात आला.
पण हक्कभंग नोटिशीला संजय राऊतांनी केराची टोपली दाखवली. त्यामुळे वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे. संजय राऊत यांच्या विधानावर सत्ताधारी भाजप आणि शिवेसनेच्या आमदारांनी दोन्ही सभागृहांमध्ये आणि सभागृहाबाहेरही गोंधळ घातला होता.