23.1 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeमहाराष्ट्रसंभाजीराजे समर्थकांची नवी मुंबईत बॅनरबाजी

संभाजीराजे समर्थकांची नवी मुंबईत बॅनरबाजी

एकमत ऑनलाईन

मुंबई : राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी छत्रपती संभाजीराजे इच्छुक होते. त्यासाठी, सर्वपक्षीय आमदारांकडे मतदान करण्याची मागणीही केली होती. त्यात, शिवसेना आणि संभाजीराजे यांच्यातील बोलणी फिस्कटली. त्यामुळे, निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला होता. आता, राज्यसभेच्या निवडणुकीत शिवसेना उमेदवाराचा पराभव झाल्याने शिवसेनेवर संभाजीराजे समर्थकांकडून टिका करण्यात येत आहे.
खासदारकीच्या उमेदवारीवरुन शिवसेना आणि संभाजीराजे यांच्यात चांगलेच मतभेद झाले आहेत.

त्यातच, राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेने दिलेला ६ वा उमेदवार पराभूत झाल्यानंतर संभाजीराजेंनी ट्विट करुन शिवसेनेला लक्ष््य केले. त्यांनी कुठेही शिवसेनेचा उल्लेख केला नाही. मात्र, शिवसेनेला टोला लगावला. तर, आता नवी मुंबईत संभाजीराजेंच्या समर्थनार्थ बॅनर झळकले आहेत.

बॅनरच्या माध्यमातून शिवसेना व मुख्यमंत्र्यांना टोला लगावण्यात आला आहे. शिवरायांचा गनिमीकावा वापरून छत्रपतींच्या अपमानाचा बदला घेणा-या सर्व आमदार मावळ्यांचे आभार, असे म्हणत शिवसेनेवर निशाणा साधला. तसेच, आज पुन्हा सिद्ध झाले; महाराष्ट्र आमच्या बापाचा, राज्यसभा तो झाकी है, स्वराज्य मे २०२४ बाकी है, अशा आशयाचे बॅनर मुंबईत चर्चेचा विषय ठरत आहेत.

खासदार संभाजीराजे यांनी शिवबंधन बांधण्यास नकार दिल्यानंतर शिवसेनेने कोल्हापूरचे शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांना राज्यसभेची उमेदवारी दिली. महाविकास आघाडीकडे संख्याबळ जास्त असल्याने त्यांचा विजय निश्चित मानला जात होता. मात्र, देवेंद्र फडणवीसांची रणनिती यशस्वी ठरली. अपक्ष आणि लहान पक्षांतील आमदारांना आपलेसे करण्यात ते यशस्वी ठरले. त्यामुळे, ६ व्या जागेवर शिवसेना उमेदवार पराभूत झाला. भाजपचे धनंजय महाडिक खासदार झाले.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या