Tuesday, October 3, 2023

बारामती ते हडपसर एसटी आजपासून धावणार

शुक्रवार पासून बारामती, पणदरे, कोऱ्हाळे, वडगाव, सोमेश्‍वर-नीरा-वाल्हे-जेजुरी-सासवड मार्गे हडपसर अशी बससेवा सुरू होणार

बारामती  – बारामती एमआयडीसी आगारातून बारामती ते हडपसर अशी बससेवा शुक्रवार (दि. 19) पासून सुरू होणार आहे. नीरा मार्गे ही बससेवा सुरू होणार आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर अडीच महिन्यांपेक्षा अधिक कालावधी करिता बंद असलेली लालपरी सोमवार (दि. 15) पासून पुन्हा धावू लागली आहे. बारामती आगारातून बारामती-पुणे अशा दोन फेऱ्या होत आहेत. मोरगावमार्गे ही बस सेवा सुरू करण्यात आली आहे.

त्यापाठोपाठ एमायडीसी आगारातून देखील शुक्रवार पासून बारामती, पणदरे, कोऱ्हाळे, वडगाव, सोमेश्‍वर-नीरा-वाल्हे-जेजुरी-सासवड मार्गे हडपसर अशी बससेवा सुरू होणार आहे. स्वारगेट प्रतिबंध क्षेत्र असल्याने ही बससेवा हडपसरपर्यंतच असणार आहे.नीरा मार्गे पुणे(हडपसर) ही बस सकाळी 6.30वाजता आणि दुपारी 12.30 या वेळेत सुटणार आहे. तर निरा येथून पुण्यासाठी सुटण्याची वेळ सकाळी 07.45 व दुपारी 13.45 अशी आहे. (हडपसर)पुणे येथून परत निरामार्गे बरमाती सकाळी 11 वाजता व सायंकाळी 5 या वेळेत सुटणार आहे.

Read More  शासनाचा निर्णय : सॅनिटरी नॅपकिन्स प्रतिपॅड 1 रूपये दराने उपलब्ध

Related Articles

More....

लोकप्रिय बातम्या