27.4 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeमहाराष्ट्रदादरमध्ये राज्यपालांच्या कार्यक्रमात बत्ती गुल

दादरमध्ये राज्यपालांच्या कार्यक्रमात बत्ती गुल

एकमत ऑनलाईन

मुंबई : मुंबईतील दादर परिसरात सकाळी सव्वा दहा वाजण्याच्या सुमारास अचानक वीज पुरवठा खंडित झाला. याच परिसरात आज स्काऊट्स आणि गाईड्स राज्य पुरस्कार प्रमाणपत्र वितरण समारंभ आयोजित करण्यात आला होता. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते हा पुरस्कार समारंभ होत आहे. मात्र, या कार्यक्रमापूर्वीच वीज पुरवठा खंडित झाला. साधारणत: अर्ध्या तासाने हा वीज पुरवठा सुरळीत झाला असल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मुंबईतील दादर, वांद्रे, माहिम आणि सांताक्रूझ परिसरातील वीज पुरवठा अचानक खंडित झाला. काही तांत्रिक कारणांमुळे वीज पुरवठा खंडित झाला. अचानक वीज गेल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. वीज पुरवठा खंडित झाल्याने बेस्टकडून तात्काळ दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आणि वीज पुरवठा सुरळीत केला.

सकाळी १०.१५ वाजण्याच्या सुमारास कळवा-पडघा येथील ४०० केव्हीची लाईन ट्रिप झाली. याचा परिणाम मुंबई, ठाणे परिसरात होणा-या वीज पुरवठ्यावर झाला. त्यानंतर तात्काळ दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आणि वीज पुरवठा पुन्हा सुरळीत करण्यात आला.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या