23.6 C
Latur
Tuesday, October 4, 2022
Homeमहाराष्ट्रबावनकुळे भाजप प्रदेशाध्यक्ष?

बावनकुळे भाजप प्रदेशाध्यक्ष?

एकमत ऑनलाईन

मुंबई : शिंदे-फडणवीस सरकारच्या कॅबिनेटमध्ये चंद्रकांत पाटील यांची वर्णी लागल्यामुळे भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदावर खांदेपालट होण्याची शक्यता आहे. याआधी आशिष शेलार यांचे नाव शर्यतीत होते. मात्र, आता चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर भाजप प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे, तर आशिष शेलार यांच्याकडे मुंबई भाजप अध्यक्षपदाची सूत्रे दिली जाण्याची चिन्हे आहेत.

भाजपचे दमदार नेते मंगलप्रभात लोढा यांची मंत्रिमंडळात वर्णी लागल्याने आशिष शेलार यांच्याकडे मुंबई भाजपची जबाबदारी सोपवली जाण्याचे संकेत मिळत आहेत. भाजपमधील महत्त्वाचा चेहरा म्हणून आशिष शेलार यांची ओळख आहे. मराठा नेता, टास्कमास्टर, सर्वपक्षातील नेत्यांशी उत्तम संबंध या शेलारांच्या जमेच्या बाजू आहेत. फडणवीस सरकारमध्ये शेलारांकडे ५ महिने शिक्षण मंत्रिपद होते. विनोद तावडेंनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर शेलार यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली होती. यंदाही त्यांना कॅबिनेट मंत्रिमंडळात स्थान मिळालेले नाही.

भाजपमधील महत्त्वाचा मराठा चेहरा म्हणून आशिष शेलारांकडे पाहिले जाते. फडणवीसांच्या तोडीचे नेते अशी त्यांची राजकीय वर्तुळात ओळख आहे. आगामी मुंबई महापालिका निवडणुकांच्या तोंडावर आक्रमक पद्धतीने मैदानात उतरण्यासाठी भाजप शेलारांवर जबाबदारी देण्याची चिन्हे आहेत.

२०१७ मध्ये शेलारांच्या
नेतृत्वात मिळाले यश
२०१७ मध्ये मुंबई महापालिकेची निवडणूक झाली. ही निवडणूक शिवसेना आणि भाजप स्वबळावर लढवली. त्यावेळी शेलार यांच्याकडे निवडणुकीची जबाबदारी दिली होती. त्यावेळी भाजपने ३१ वरून ८२ वर उडी मारली होती. त्यामुळे आता पुन्हा शेलारांकडे मोठी जबाबदारी देण्याचा विचार झाल्याचे समजते.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या