26.9 C
Latur
Tuesday, March 2, 2021
Home महाराष्ट्र स्पष्ट सांगा, विषय सोडून देऊ; अण्णा कडाडले

स्पष्ट सांगा, विषय सोडून देऊ; अण्णा कडाडले

एकमत ऑनलाईन

अहमदनगर: शेतकरी हितासाठी आपण मोदी सरकारकडे मांडलेल्या मागण्यांबाबत खोटी आश्वासने देणे बंद करा. तुमची भुमिका काय ते स्पष्ट सांगा म्हणजे मागणी करणारे लोक विषय तरी सोडून देतील. देश चालविणा-यांना खोटे बोलणे शोभत नाही, असे निर्वाणीचे इशारावजा पत्र ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिले आहे.

शेतक-यांंच्या प्रश्नांवर आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर केंद्र सरकारकडून एकाही पत्राला उत्तर आले नाही. त्यामुळे अण्णा हजारे केंद्र सरकारवर भडकले आहेत. हजारे यांनी आज पुन्हा पंतप्रधानांना पत्र लिहिले आहे. मागील आंदोलनाच्या वेळी आपण लेखी आश्वासन देऊन मागण्या मान्य करीत असल्याचे म्हटले होते. मात्र, त्यावर काहीही झाले नाही.

मागण्या पूर्ण करायच्या नसतील तर सरकारने खोटी आश्वासने देऊ नयेत. सरकार जेव्हा अडचणीत येते तेव्हा त्यातून बाहेर पडण्यासाठी खोटी आश्वासने देते. आश्वासन देऊनही सरकारने त्याची पूर्तता झालेली नाही. मी आतापर्यंत जनतेच्या भल्यासाठी आंदोलन करीत आलो आहे. आता शेतक-यांच्या प्रश्नांवर जीवाची बाजी लावायला तयार आहे. सत्तेसाठी आपले सरकार सत्यापासून दूर जाते, याचे वाईट वाटते, असेही हजारे यांनी पत्रात म्हटले आहे.

गांजामुळे कोरोनापासून बचाव शक्य

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,439FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या