28.1 C
Latur
Sunday, October 2, 2022
Homeमहाराष्ट्रयेणा-या निवडणुकीस तयार रहा

येणा-या निवडणुकीस तयार रहा

एकमत ऑनलाईन

नागपूर : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विदर्भ दौ-याचा आज पहिला दिवस असून त्यांनी आज नागपुरात आपल्या पदाधिका-यांची पहिली बैठक घेतली. येणा-या निवडणुकीसाठी तयारीला लागण्याचे आदेश त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिले आहेत.

ऑपरेशननंतर त्यांचा हा पहिलाच दौरा असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे विदर्भात आपल्या कार्यकर्त्यांसोबत ब-याच बैठका घेणार आहेत.

आगामी निवडणुकांसाठी स्थानिक पातळीवर पक्षाची मोर्चेबांधणी करा, मी लवकरच विदर्भात येईन पण तोपर्यंत पक्ष नीट बांधा, आपल्या पक्षात बदल निश्चित होणार असून पक्षात नवी उर्जा आणण्याचे काम आपल्याला करायचं आहे. आपण सगळे मिळून पक्षाच्या नवनिर्माणाचं काम करू, त्यासाठी तुम्हाला स्थानिक पातळीवर पक्ष बांधावा लागेल अशा सूचना त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिल्या आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या