28.3 C
Latur
Friday, June 25, 2021
Homeमहाराष्ट्रमाझा डॉक्टर्स बनून मैदानात उतरा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आवाहन

माझा डॉक्टर्स बनून मैदानात उतरा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आवाहन

एकमत ऑनलाईन

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतील एका वैशिष्ट्यपूर्ण व्हीडीओ कॉन्फरन्सद्वारे रविवार दि़ ९ मे रोजी राज्य टास्क फोर्समधील तज्ज्ञ डॉक्टरांनी मुंबईतील सुमारे ७०० खासगी डॉक्टरांना कोरोनाबाबतीत वैद्यकीय उपचारांबाबत निश्चित काय पद्धती अवलंबवावी याविषयी एकाचवेळी मार्गदर्शन केले आणि त्यांच्या अनेक शंकांचे निरसन केले. त्याचबरोबर माझा डॉक्टर्स बनून मैदानात उतरा असे आवाहन मुख्यमंत्री ठाकरे यांनी डॉक्टरांना केले आहे़

विशेष म्हणजे तीन चार दिवसांपूर्वी अशाच पद्धतीने मुंबईतील सुमारे ३०० डॉक्टर्सशी संवाद साधण्यात आला होता. दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित या दोन्ही सभांमध्ये मिळून मुंबईतील सुमारे एक हजार डॉक्टरांनी सहभाग घेतला. केवळ काही डॉक्टरांशी न बोलता तंत्रज्ञानाचा सुयोग्य उपयोग करून अगदी थेट तळागाळात काम करणा-या शेवटच्या डॉक्टरशी बोलण्याचा आणि त्यांच्याही सुचना ऐकून घेण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या उपक्रमाचे वैद्यकीय क्षेत्रात स्वागत होत आहे.

अशाच रितीने राज्यातील इतर विभागातील डॉक्टर्सशी देखील संवाद साधण्यात येणार आहे. या सभेच्या प्रारंभी बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना प्रतिबंधात वैद्यकीय क्षेत्र करीत असलेल्या लढाईसाठी त्यांची प्रशंसा केली तसेच येणा-या तिस-या लाटेचा मुकाबला करण्यासाठी सज्ज राहण्यास सांगितले. मुख्यमंत्री यावेळी म्हणाले की, कोरोना काळात फॅमिली डॉक्टरांची भूमिका अतिशय महत्वाची आहे. कारण कोणत्याही लहान मोठ्या आजारात रुग्ण पहिल्यांदा आपल्या जवळच्या, परिवाराच्या डॉक्टरशी संपर्क साधतो. त्यामुळे त्यांची जबाबदारी खूप महत्वाची आहे. सर्वसामान्यांना आपण माझा डॉक्टर बनून त्यांना मार्गदर्शन केल्यास रोगाच्या सुरुवातीच्या टप्प्यातच तो रोखण्यात मोठी मदत होणार आहे, असे ते म्हणाले.

घरी उपचारातील रुग्णांकडे लक्ष हवे
लक्षणे नसलेले रुग्ण रुग्णालयात जातात आणि आवश्यक नसतानाही त्यांना बेड्स उपलब्ध करून दिले जातात यामुळे ख-या गरजू रुग्णांना सुविधा मिळत नाहीत. घरच्या घरी विलगीकरणातील रुग्णांकडे आपण सर्व डॉक्टरांनी लक्ष देणे, त्यांची विचारपूस करीत राहणे गरजेचे आहे. त्यामुळे रुग्णाला मानसिक आधारही मिळतो आणि त्याची तब्येत खालावत असेल तर वेळीच त्याला रुग्णालयात दाखल करणे शक्य होत असल्याचे ठाकरे म्हणाले.

कोविड उपचार केंद्रांमध्येही सेवा द्या
आपल्या परिसरातील कोविड उपचार केंद्र किंवा जम्बो केंद्रांना देखील आपल्या सेवेची गरज आहे हे लक्षात ठेवून खासगी डॉक्टरांनी तिथेही आपली नावे नोंदवावी असे आव्हान करून मुख्यमंत्री म्हणाले की, राज्यात सर्वत्रच उपचार पद्धतीत एकवाक्यता असणे फार महत्वाचे आहे. राज्यात १२७० मेट्रिक टन ऑक्सिजन निर्माण केला जातो मात्र कोविड मुळे सध्या १७०० मेट्रिक टनापर्यंत आपली गरज वाढली आहे. आपण ऑक्सिजनच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनण्यासाठी कमी आणि दीर्घ कालासाठीचा आराखडा तयार केला असून, त्यामुळे लवकरच राज्यांतर्गत ऑक्सिजनची वाढीव निर्मिती शक्य होईल अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली.

प्रत्येक परिस्थितीवर नजर ठेवून; ४ राज्यांतील कोरोना स्थितीचा पंतप्रधान मोदींकडून आढावा

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
202FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या