25.6 C
Latur
Wednesday, August 10, 2022
Homeमहाराष्ट्रआता तरी नीट वागा; आमदार शिंदेंचा शरद पवारांना टोला

आता तरी नीट वागा; आमदार शिंदेंचा शरद पवारांना टोला

एकमत ऑनलाईन

सातारा : राज्यात फडणवीस-शिंदे सरकार स्थापन झाल्यानंतर कोरेगावचे बंडखोर आमदार महेश शिंदे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. उसाची आडवाआडवी जिरवाजिरवी करू नका. आता एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचे सामान्य जनतेचे, शेतक-यांचे राज्य आले आहे, असे आमदार महेश शिंदे यांनी म्हटले आहे.

आता बारामतीकरांचे राज्य संपले आहे. हे ध्यानात घ्या आणि नीट वागा, असा सल्ला वजा इशाराही महेश शिंदे यांनी राष्ट्रवादीसह शरद पवार यांना दिला आहे.

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेसोबत बंडखोरी करत भाजपासोबत मिळून सरकार देखील स्थापन केले. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर शिवसेनेतून शिंदे गटात दाखल होणा-या पदाधिका-यांची संख्या वाढतच आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या