25 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeमहाराष्ट्रवारंवार हिंदू म्हटल्याने कुणाचे हिंदुत्व मोठे होत नाही

वारंवार हिंदू म्हटल्याने कुणाचे हिंदुत्व मोठे होत नाही

एकमत ऑनलाईन

मुंबई : आज देशासमोर अनेक समस्या आहेत. जनतेचे लक्ष हटवण्याचा केंद्र सरकार प्रयत्न करत आहे. वारंवार हिंदू म्हटल्याने कुणाचे हिंदुत्व मोठे होत नाही. सातत्याने भाजप प्रमुख मुद्यांवरून लक्ष हटवण्याचा प्रयत्न करत असते, असा हल्लाबोल काँग्रेसचे नाना पटोले यांनी केला. आज शिर्डी येथील काँग्रेसच्या चिंतन शिबिरात ते बोलत होते.

यावेळी बोलताना त्यांनी केंद्रातील भाजप सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले, भाजप प्रमुख मुद्यांवरून लक्ष हटवण्याचा प्रयत्न करत आहे हे चुकीचे आहे. यामुळे देशातील संविधानालाही धक्का बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपने हे काम बंद करून देशासाठी योग्य ते निर्णय घेण्याची आवश्यकता आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. भाजप देशातील धार्मिक सौहार्द ढवळून काढत असल्याचा घणाघातही त्यांनी केला आहे.

पुढे ते म्हणाले, देशासमोर अनेक समस्या आहेत. आज सायंकाळी जाहीर सभेमध्ये काँग्रेसची पुढची भूमिका मांडणार आहे आणि केंद्रातील भाजप सरकारमुळे देशाचे किती मोठे नुकसान झाले आहे, याची माहितीही या सभेत देणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या