21.4 C
Latur
Friday, October 7, 2022
Homeमहाराष्ट्रमुंबईत बेस्ट बसचा अपघात; रिक्षाचा चेंदामेंदा

मुंबईत बेस्ट बसचा अपघात; रिक्षाचा चेंदामेंदा

एकमत ऑनलाईन

मुंबई : शहरातील बेस्टच्या बसचा अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेजदेखील समोर आले आहेत. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, काहीजण जखमी झाले आहेत. मागील काही दिवसांपासून मुंबईत बेस्ट बसच्या अपघातांची संख्या प्रचंड प्रमाणात कमी झाल्याची बाब निदर्शनास आली. त्यात अशी घटना घडल्यामुळे सर्वच विचलित झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, कुंडलिक किसन धोंगडे हे ३२६ क्रमांकाची बस चालवत होते. ही बस शिवशाही प्रकल्प, दिंडोशीवरून कुर्ल्याकडे जात होती. त्यावेळी साधारण साडेतीन वाजेच्या सुमारास संतोषनगर, बीएमसी कॉलनी, डी वॉर्डसमोरील मंदिराला बसने धडक दिली. बसने केवळ धडकच दिली नाही तर बससमोरील जेवढ्या रिक्षा होत्या त्या सर्व रिक्षांचा चेंदामेंदा झाला. या अपघातात बसचालक आणि वाहक दोघेही जखमी झाले असून काही बस प्रवासीही किरकोळ जखमी झाले आहेत. त्यांच्यावर वेदांत खासगी रुग्णालय, दिंडोशी येथे उपचार सुरू आहेत.

प्राथमिक माहितीनुसार, जखमींवर नजीकच्या रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. दरम्यान, अपघात झाला त्यावेळी बसमध्ये प्रवासीही होते. चालकाच्या सतर्कतेमुळे मोठा अपघात टळला. प्राथमिक स्तरावर समोर आलेल्या माहितीनुसार ब्रेक फेल झाल्याने हा अपघात झाल्याचे कळत आहे. परिस्थिती गंभीर असतानाही चालकाच्या सतर्कतेमुळे मोठा अपघात टळला.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या