27 C
Latur
Saturday, August 13, 2022
Homeमहाराष्ट्रगद्दार हे गद्दारच, चिन्ह अन् पक्ष उद्धव ठाकरेंसोबत : आदित्य ठाकरे

गद्दार हे गद्दारच, चिन्ह अन् पक्ष उद्धव ठाकरेंसोबत : आदित्य ठाकरे

एकमत ऑनलाईन

मुंबई : गद्दार हे गद्दार असतात पण ज्यांना परत यायचे आहे त्यांच्यासाठी शिवसेनेचे दारं उघडे आहेत असे वक्तव्य शिवसेनेचे आदित्य ठाकरे यांनी केले आहे. शिवसेना भवनात शिवसैनिक आणि पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. त्यावेळी त्यांनी बंड केलेल्या आमदारांवर जोरदार टीका केली.

ज्या आमदारांना परत शिवसेनेत यायचे आहे. त्यांच्यासाठी सेनेचे दारे उघडे आहेत, गद्दार हे गद्दार असतात असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. दरम्यान शिवसेना नाव आणि पक्षाचे चिन्ह मिळवण्यासाठी शिंदे गटाकडून प्रयत्न केले जात आहेत पण शिवसेना नाव आणि पक्षाचे चिन्ह उद्धव ठाकरे यांच्याकडेच राहणार आहे असेही ते म्हणाले आहेत.

दरम्यान शिंदे सरकारचा पहिल्या टप्प्यातील मंत्र्यांचा शपथविधी येत्या शनिवारी पार पडणार असल्याची माहिती मिळाली आहे. शिंदे गटाकडे महसूल तर भाजपकडे अर्थ आणि गृहमंत्रिपद जाणार असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांनी आज मंत्रालयातील मुख्यमंत्री कार्यालयाचा पदाभार स्विकारला आहे.

शिंदे यांनी शिवसेनेशी बंड करून भाजपसोबत सरकार स्थापन केल्यानंतर शिवसेनेला मोठा फटका बसलाय. सेनेचे ५५ पैकी ४० आमदार शिंदे गटात गेले आहेत. तर अजूनही काही आमदार शिंदे गटात जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे. सेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी उद्धव ठाकरे यांना पत्र लिहित भाजपच्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना मतदान करण्याची मागणी केली आहे. तर माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी काल आपल्या शिवसेना नेतेपदाचा राजीनामा दिल्याने सेनेला मोठा धक्का बसला आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या