23.6 C
Latur
Tuesday, October 4, 2022
Homeमहाराष्ट्रभंडारा बलात्कार प्रकरण : पोलीस अधिकारी, २ कर्मचारी निलंबित

भंडारा बलात्कार प्रकरण : पोलीस अधिकारी, २ कर्मचारी निलंबित

एकमत ऑनलाईन

भंडारा : सामुहिक बलात्कार प्रकरणी भंडारा पोलिसांनी मोठी कारवाई केली असून कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी एका पोलीस अधिका-यावर तर दोन कर्मचा-यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

पोलिसांनी १२ तासांच्या आत मुख्य आरोपीला बेड्या घातल्याचा दावा पोलिसांकडून करण्यात आला आहे. पोलीस उपमहानिरिक्षक संदीप पाटील यांनी यासंदर्भातील अधिकृत माहिती दिली आहे.

डीआयजी पाटील म्हणाले, ही घटना घडल्यानंतर भंडारा पोलिसांनी मुख्य आरोपींवर १२ तासांच्या आत कारवाई केली. यामध्ये एक मुद्दा समोर आला आहे की, रात्री पीडित महिला लाखणी पोलीस स्टेशनमध्ये आली होती. त्यावेळी नेमकं काय झाले? याची चौकशी भंडारा जिल्हा पोलीस प्रमुखांनी केली आहे. त्या अहवालानुसार एक पोलीस अधिकारी आणि दोन कर्मचा-यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या