23.8 C
Latur
Friday, October 7, 2022
Homeमहाराष्ट्रपुण्यात भरधाव बसचे ब्रेक फेल ; तीन जण गंभीर जखमी

पुण्यात भरधाव बसचे ब्रेक फेल ; तीन जण गंभीर जखमी

एकमत ऑनलाईन

पुणे : धनकवडी येथील सदगुरु श्री शंकर महाराज उड्डाणपुलावर एसटी बसचे ब्रेक फेल झाल्याने बसने उड्डाणपुलावरून जाणा-या एका चारचाकी व सहा-सात दुचाकींना धडक दिली. ही घटना आज गुरुवारी सकाळी साडेअकरा वाजता घडली.
या अपघातामध्ये तीन जण गंभीर जखमी झाले असून जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. चार ते पाच जण किरकोळ जखमी झाले आहेत.

सातारा-स्वारगेट बस क्रमांक एमएच ०६ एस ८४६७ ही सातारा येथून सकाळी पुण्याकडे जाण्यास निघाली. दरम्यान गुरुवारी सकाळी साडेअकरा वाजता एसटी बस धनकवडी येथील सदगुरु श्री शंकर महाराज उड्डाणपुलावरून जाताना अचानक एसटी बसचे ब्रेक न लागल्याने समोरच्या वाहनांना धडक देत बाजूच्या संरक्षक भिंतीला हॅण्ड लॉक होऊन थांबल्याने सुदैवाने मोठी दुर्घटना टळली.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या