33.7 C
Latur
Monday, March 1, 2021
Home महाराष्ट्र भास्करराव पेरे-पाटील मीडियावर नाराज

भास्करराव पेरे-पाटील मीडियावर नाराज

एकमत ऑनलाईन

अहमदनगर : आदर्शगाव पाटोदाचे प्रवर्तक आणि आदर्श सरपंच भास्करराव पेरे-पाटील यांच्या मुलीचा यावेळी ग्रामपंचायत निवडणुकीत पराभव झाला. याची मोठी चर्चा राज्यभर झाली. यासंबंधी पेरे-पाटील यांनी प्रथमच आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ‘आपण या निवडणुकीपासून पूर्णपणे अलिप्त होतो. आमच्या कुटुंबातील एकाही सदस्याने मतदानही केले नाही. त्यामुळे मुलीच्या पराभवाचे माध्यमांमधून जे चित्र मांडले जात आहे, ते चुकीचे आहे,’ असे पेरे-पाटील यांनी म्हटले आहे.

श्रीगोंदा येथील एका कार्यक्रमासाठी पेरे-पाटील आले होते. त्यावेळी त्यांनी यावर भाष्य केले. ते म्हणाले, ‘गेल्या पंचवीस वर्षांपासून गावात काम करण्याची संधी मिळाली. पाच निवडणुका आपण लोकशाही मार्गाने लढविल्या. त्यात यश आले, त्यानुसार काम करीत राहिलो. यावर्षी मात्र आपण अलिप्त राहण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे प्रत्यक्ष निवडणुकीत उतरलो नाही. कोणाचा प्रचारही केला नाही. ग्रामपंचायतीच्या आठ जागा बिनविरोध झाल्या. तीन जागांसाठी मतदान घेण्याची वेळ आली. त्यासाठी माझ्या मुलीने जेव्हा उमेदवारी अर्ज भरला, तेव्हाच तिला सांगितले की, तू तुझा निर्णय घे. मला सर्व उमेदवार सारखेच आहेत.

या निवडणुकीत मी कोणाचाही प्रचार करणार नाही. त्यानुसार आपण वागलोही. निवडणूक काळात आपण गावात न थांबता बाहेरच होतो. गावात आमच्या कुटुंबातील ११ मते आहेत. या निवडणुकीत माझ्यासह घरातील कोणी मतदानही केले नाही. मुलीचा अतिशय कमी मतांनी पराभव झाला आहे. यावरून निवडणुकीत नेमकी कशी स्थिती होती, आमची काय भूमिका होती, हे लक्षात येईल. मात्र, प्रसार माध्यमांनी याकडे दुर्लक्ष करून वेगळे व चुकीचे चित्र मांडले. पंचवीस वर्षांच्या काळात गाव आणि सोबतच गावांतील लोकांचे विचार बदलू शकलो, याचे समाधान आहे. चांगले काम करून दाखविल्यानेच गावातील लोक माझ्या पाठीशी राहिले,’ असेही पेरे-पाटील म्हणाले.

२१०० कोंबड्यांना दयामरण

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,438FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या