वाशिम : उद्धव ठाकरे यांना ‘जय महाराष्ट्र’ करून शिंदे गटात गेलेल्या भावना गवळी यांच्यासमोरच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. त्यांचे पूर्वाश्रमीचे पती कॅप्टन प्रशांत सुर्वे यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला.
खासदार भावना गवळी आणि प्रशांत सुर्वे यांचा २०१३ साली घटस्फोट झालेला होता. भावना गवळी यांच्याशी विभक्त झाल्यानंतर प्रशांत सुर्वे यांनी २०१४ मध्ये लोकसभेची निवडणूक अपक्ष लढवली होती.
त्यांनी भावना गवळी यांच्या विरोधात लोकसभा निवडणूक लढवली होती. प्रशांत सुर्वे हे मूळचे वाशिम जिल्ह्यातील रहिवाशी असल्याने त्यांच्या शिवसेना प्रवेशानंतर खासदार भावना गवळी यांच्या समोर एक तगडे आव्हान मतदारसंघात उभे राहण्याची शक्यता आहे.