24.3 C
Latur
Thursday, June 24, 2021
Homeमहाराष्ट्रभिवंडी दुर्घटनेतील मृतांची संख्या 39 वर; 14 मृतदेह ढिगारा उपसताना आढळून आले

भिवंडी दुर्घटनेतील मृतांची संख्या 39 वर; 14 मृतदेह ढिगारा उपसताना आढळून आले

एकमत ऑनलाईन

ठाणे – भिवंडी येथे इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेतील मृतांची संख्या आता 39 झाली आहे. काल रात्रीत तेथे आणखी 14 मृतदेह ढिगारा उपसताना आढळून आले आहेत.

मृतांमध्ये पंधरा लहान मुलांचा समावेश आहे. ही मुले 2 ते 15 वयोगटातील आहेत. मदतपथकांनी ढिगाऱ्या खाली अडकलेल्या 25 जणांना तेथून वाचवले आहे. मात्र, ते बऱ्यापैकी जखमी असल्याने त्यांना भिवंडी आणि ठाण्यातील रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे.

काल रात्री तुफान पावसातही या इमारतीचा ढिगारा उपसण्याचे काम मदत पथके करीत होती. रात्री जे मृतदेह तेथे सापडले ते सुमारे 50 तास या ढिगाऱ्याखाली अडकलेले असल्याने त्या मृतदेहांची अवस्था अत्यंत खराब झाली आहे. 43 वर्षे जुनी असलेली जिलानी नावाची ही इमारत सोमवारी पहाटे 3.40 च्या सुमाराला कोसळली होती.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
202FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या