21.9 C
Latur
Thursday, September 23, 2021
Homeमहाराष्ट्रबीएचआरची चौकशी भाजपच्याच आदेशाने

बीएचआरची चौकशी भाजपच्याच आदेशाने

एकमत ऑनलाईन

जळगाव : सुमारे दीड हजार कोटी रुपयांवर आर्थिक गैरव्यवहार असलेल्या बीएचआर मल्टिस्टेट सोसायटी प्रकरणी चौकशी सुरू असून, या चौकशीचा आदेश खुद केंद्र सरकारनेच दिला असल्याचा खुलासा आज राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी येथे केला. या चौकशीच्या मागणीसाठी स्वत: एकनाथ खडसे यांच्यासह खासदार रक्षा खडसे, अ‍ॅड. कीर्ती पाटील यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यावेळी राजकीय दबाव होता, मात्र आता यंत्रणेने हा दबाव झुगारून चौकशी सुरू केली आहे. यात अनेक मोठी नावे पुढे येणार असल्याचे माजी मंत्री खडसे यांनी सांगितले. तसेच एकनाथ खडसे यांनी विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांना प्रत्युत्तर दिले आहे.

जळगाव बीएचआर गैरव्यवहाराबाबत त्यांनी माहिती न घेता कमेंट केली. बीएचआरची चौकशी ही या सरकारने नाही तर केंद्रातील भाजप सरकारच्या आदेशानेच सुरू आहे. दरेकर हे विरोधीपक्ष नेते आहेत. त्यांनी हे विषय विधान परिषदेत मांडावे. कोणत्या बँकेची चौकशी करायची त्यांनी त्यांच्या मागण्या सरकारकडे करावी. मला सांगून काय उपयोग मी काय मंत्री किंवा आमदार आहे का? असा टोला देखील एकनाथ खडसे यांनी लगावला आहे.

भाजप विरुध्द खडसे रणसंग्राम सुरू
एकनाथ खडसे हे राष्ट्रवादी गेल्यानंतर भारतीय जनता पक्षाबात काही गोष्टी बाहेर काढणार, अशा प्रकारचे चित्र उभे केले जात आहे. तसेच चर्चेत राहाण्यासाठी आरोप केले जात आहेत. हे चौकशीत समोर येईलच ११०० कोटींच्या जागा कवडीमोल दरात विकल्याचा उल्लेक खडसे करत आहेत.

बॉलिवूडला राजकीय पक्षाच्या संरक्षणाची गरज नाही

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या