मुंबई : राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचा २०२३-२४ या वर्षाकरता अर्थसंकल्प सादर केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाचा हा पहिला अर्थसंकल्प आहे. तर देवेंद्र फडणवीस यांनी अर्थमंत्री म्हणून मांडलेला पहिलाच अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पीय भाषणात देवेंद्र फडणवीस यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या.
१) केंद्राप्रमाणे शेतक-यांसाठी नमो शेतकरी महा सन्मान निधी, शेतक-यांच्या खात्यावर ६ हजार रुपये भरणार
२) महाराष्ट्रातील शेतक-यांना आता केवळ १ रुपयांत पीकविमा
३) धनगर समाजाला १००० कोटी रुपये, महामंडळामार्फत १० हजार कोटी रुपयांचे बिनव्याजी कर्ज उपलब्ध
४) छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेकाचे हे ३५० वे वर्ष. या महोत्सवासाठी ३५० कोटी रुपये
५) ५००० गावांमध्ये सुरु करणार जलयुक्त शिवार २.०
६) मुलींसाठी लेक लाडकी योजना, जन्मानंतर मुलीला ५००० रुपये
७) पहिलीत ४००० रुपये, सहावीत ६००० रुपये, अकरावीत ८००० रुपये
८) मुलगी १८ वर्षांची झाल्यावर ७५,००० रुपये
९) आशा स्वयंसेविकांचे मानधन ३५०० वरुन ५००० रुपये
१०) महात्मा ज्योतिराव फुले जनारोग्य योजनेत, आता ५ लाखांपर्यंत उपचार करता येणार
११) संजय गांधी निराधार/श्रावणबाळ योजनेत अर्थसहाय्य आता १००० हून १५०० रुपये
१२) महिलांना एसटी प्रवासात, सरसकट ५० टक्के सूट