23.6 C
Latur
Tuesday, October 4, 2022
Homeमहाराष्ट्रउद्धव ठाकरेंना निवडणूक आयोगाचा मोठा झटका

उद्धव ठाकरेंना निवडणूक आयोगाचा मोठा झटका

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाची सुनावणी पुढे ढकलल्यानंतर आता निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरेंना झटका दिला आहे. शिवसेनेच्या निवडणूक चिन्हाबाबत सुनावणीसाठी मागितलेली चार आठवड्यांच्या मुदतची मागणी फेटाळत केवळ पंधरा दिवसातच उत्तर सादर करण्याचे आदेश आयोगाने दिले आहेत.

शिवसेनेत फूट पडल्यानंतर खरी शिवसेना कोणती उद्धव ठाकरे गटाची की एकनाथ शिंदे गटाची याचा मोठा पेच निर्माण झाला आहे. त्यानुसार शिवसेनेचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाणावर कोणत्या गटाचा अधिकार राहिल, यावर निवडणूक आयोग सुनावणी घेणार आहे. तत्पूर्वी आवश्यककागदपत्रांसह उत्तर देण्यासाठी ८ ऑगस्टपासून चार आठवड्यांचा वेळ द्यावा म्हणजेच ८ सप्टेंबरपर्यंतचा वेळ द्यावा अशी मागणी उद्धव ठाकरे गटाकडून करण्यात आली होती. पण निवडणूक आयोगाने त्यांची मागणी फेटाळत केवळ १५ दिवसांत उत्तर द्यावे असे निर्देश दिले आहेत.

त्यामुळे आता २३ ऑगस्ट रोजी उद्धव ठाकरे गटाला निवडणूक आयोगापुढे आपले म्हणणे मांडावे लागणार आहे. म्हणजेच २२ तारखेला सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी त्यानंतर दुस-याच दिवशी निवडणूक आयोगाला उत्तर उद्धव ठाकरे गटाला द्यावे लागणार आहे. यावरून शिवसेनेला दोन्ही बाजूंनी कसरत करावी लागणार आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या