21.2 C
Latur
Wednesday, January 20, 2021
Home महाराष्ट्र राज्यसरकारचा मोठा निर्णय ; अतिवृष्टीग्रस्त शेतक-यांसाठी १० हजार कोटींचे पॅकेज

राज्यसरकारचा मोठा निर्णय ; अतिवृष्टीग्रस्त शेतक-यांसाठी १० हजार कोटींचे पॅकेज

एकमत ऑनलाईन

मुंबई: अतिवृष्टीमुळ नुकसान झालेल्या राज्यातील शेतक-यांसाठी राज्य सरकारने मदतीचा मोठा हात दिला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १० हजार कोटी रुपयांची आर्थिक मदत देण्याची घोषणा शुक्रवारी केली. दिवाळीपर्यंत ही मदत शेतक-यांपर्यंत पोहोचवली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. गेल्या काही दिवसांपुर्वी झालेल्या परतीच्या पावसाने राज्याच्या बहुतांश भागात शेतक-यांचे मोठे नुकसान केले. काढणीसाठी आलेली व काढून ठेवलेली पिके अक्षरक्ष:वाहून गेली. सध्या राज्यातील शेतकरी वर्ग संपुर्ण उद्धवस्त झाला आहे. अशावेळी राज्यसरकारने १० हजार कोटी रुपयांची मदत जाहीर करुन शेतक-यांना दिलासा दिला आहे.

शेतकरी संकटात सापडल्यानंतर विरोधी पक्षांकडून राज्यसरकारवर मोठ्या प्रमाणात टीकेचा भडीमार सुरु होता.स्वत: मु्ख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही राज्यातील नुकसानीचा आढावा व पाहणी केली होती. परिस्थिती गंभीर असल्याचे सर्वांनीच मान्य केले होते. मुख्यमंत्री ठाकरे यांनीही दोन दिवसांत शेतक-यांना मदतीचे आश्वासन दिले होते. त्यानुसार आज मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक घेऊन त्यात १० हजार कोटी रुपयांची मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला.

केंद्राकडून ३८ हजार येणे बाकी
‘परिस्थिती कठीण आहे. राज्य सरकारपुढेही अनेक आर्थिक अडचणी आहेत. केंद्र सरकारकडून येणे असलेले ३८ हजार कोटी अजूनही मिळालेले नाहीत. अद्यापही पूर, अतिवृष्टीसंदर्भात केंद्राचे पथक पाहणीसाठी आलेले नाही. आम्ही दोन तीनदा विनंती केली आहे. त्यांच्याकडून मदत मिळेल अशी अपेक्षा आहे. पण राज्य सरकार शेतकºयांवर संकट येऊ देणार नाही, हा आमचा शब्द आहे. सणासुदीच्या दिवसात शेतकºयांच्या डोळ्यात अश्रू असू नये हा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

महानिर्मितीच्या येलदरी जलविद्युत प्रकल्पातून बावन्न वर्षातील सर्वोच्च वीजनिर्मिती

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,413FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या