22.1 C
Latur
Wednesday, August 10, 2022
Homeमहाराष्ट्र  डाळींपाठोपाठ कडधान्याच्या किमतीत मोठी वाढ

  डाळींपाठोपाठ कडधान्याच्या किमतीत मोठी वाढ

एकमत ऑनलाईन

नवी मुंबई : श्रावणातील सणांच्या तोंडावरच डाळी, कडधान्याच्या भावामध्ये वाढ झाली आहे. वाशीतील घाऊक अन्नधान्य बाजारात डाळींच्या दरात किलोमागे ५ ते १० रुपयांची वाढ झाली आहे. तूरडाळीचा भाव सर्वाधिक वाढला असून, किलोमागे ती २० ते ३० रुपयांनी महागली आहे. याशिवाय बटाटा, साबुदाणा, शेंगदाण्याच्या भावातही वाढ झाली आहे.

पूर्वी ९० ते १२० रु. प्रति किलो असणारी तूरडाळ आता १०० ते १४०-१४५ रु.च्या दरम्यान पोहोचली आहे. श्रावणात मागणी असलेल्या अख्ख्या वालाची आवक कमी असल्याने त्याचा भाव घाऊक बाजारात १८० ते १९० रु.वर पोहोचला आहे.
फराळाच्या ताटात महत्त्वाचे स्थान मिळवणारा बटाटाही गतवर्षीच्या तुलनेने महागला आहे. किरकोळ बाजारात तो ३५ ते ४० रु. किलोवर पोहोचला आहे.

शेंगदाणा घाऊक बाजारात १० ते १५ रुपयांनी स्वस्त झाला असला, तरी किरकोळ बाजारात मात्र दुपटीने महागला आहे. साखर १० ते १५ रुपये महागली आहे. साबुदाणाही किरकोळ बाजारात किलोमागे १५ ते २० रुपयांनी महागला आहे. उपवासासाठी खाल्ल्या जाणा-या भगरीच्या भावात २० रुपयांची वाढ झाली आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या