32.3 C
Latur
Sunday, April 11, 2021
Homeमहाराष्ट्रसारथी संस्थेचा कारभार अजित पवारांकडे

सारथी संस्थेचा कारभार अजित पवारांकडे

एकमत ऑनलाईन

मुंबई: मराठा समाजाला देण्यात आलेल्या आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिल्यानं समाजात अस्वस्थता आहे. या पार्श्वभूमीवर पुढील न्यायालयीन लढाईची दिशा ठरवण्यासाठी काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सर्वपक्षीय नेत्यांची महत्त्वाची बैठक बोलावली होती. यानंतर आता ठाकरे सरकारनं मराठा समाजाच्या दृष्टीनं महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे मोठी जबाबदारी सोपवली आहे.

मराठा समाजासाठी सुरू करण्यात आलेल्या सारथी संस्थेचा कारभार अजित पवारांकडे सोपवण्यात आला आहे. सारथी समाजासाठी योजना राबवण्याची जबाबदारी याआधी बहुजन कल्याण विभागाकडे होती. हा विभाग मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या अखत्यारित येतो. मात्र आता सारथी संस्थेची जबाबदारी नियोजन विभागाकडे देण्यात आली आहे. नियोजन विभागाचा कारभार उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे आहे. त्यांच्याकडेच अर्थमंत्रीपदही आहे.

सारथी संस्थेला निधी कमी पडू नये, यासाठीच संस्थेचा कारभार नियोजन विभागाकडे म्हणजेच अजित पवारांकडे देण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.मराठा समाजासाठी अनेक योजना राबवण्याचं काम सारथी संस्था करते. ठाकरे सरकारनं ही संस्था कमकुवत केल्याचा आरोप विरोधकांनी अनेकदा केला आहे. सारथी संस्थेचं कामकाज बहुजन कल्याण विभागाकडे होतं. हा विभाग काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांच्या मदत आणि पुनर्विकास मंत्रालयाकडे येतो. मराठा समाजाकडून वडेट्टीवार यांच्यावर अनेकदा टीका झाली. त्यामुळे सारथी संस्थेचा कारभार दुसऱ्या मंत्र्याकडे सोपवण्यात यावा, अशी भूमिका त्यांनी घेतली होती.

आता सारथी संस्थेची जबाबदारी नियोजन विभागाकडे देण्यात आली आहे. त्यामुळे सारथी संस्थेचा कारभार थेट अजित पवारांच्या हाती जाईल. मात्र सारथी संस्था इतर पक्षातील मंत्र्यांच्या हाती देण्यास काँग्रेसचा विरोध होता. वडेट्टीवार यांच्याकडून संस्थेचा कारभार काँग्रेसच्याच दुसऱ्या मंत्र्याकडे देण्यात यावा, अशी काँग्रेसची मागणी होती. मात्र आता सारथीची जबाबदारी अजित पवारांकडे देण्यात आल्यानं काँग्रेस नेमकी काय भूमिका घेणार, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.

भाजपा आमदार अभिमन्यू पवारांनी केले मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या “माझे कुटूंब,माझी जबाबदारी ” मोहिमेचे कौतुक

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,473FansLike
162FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या