34.4 C
Latur
Friday, March 5, 2021
Home महाराष्ट्र वाढदिवसाचा केक तलवारी, कोयत्याने कापून दहशत माजवणार्‍या सहा जणांवर गुन्हा

वाढदिवसाचा केक तलवारी, कोयत्याने कापून दहशत माजवणार्‍या सहा जणांवर गुन्हा

एकमत ऑनलाईन

सातारा : येथील दस्तगीर कॉलनीत वाढदिवसाचा केक तलवारी, कोयत्याने कापून दहशत माजवणार्‍यांना चांगलेच अंगलट आले आहे. ‘बर्थ’डे बॉयसह सहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे. त्यातील पाच जणांना शाहुपूरी पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून चार मोठे कोयते आणि एक तलवार हस्तगत केली आहे. आदिल शेख (26), शादाब पालकर (20), मिजान चौधरी (30), तोसिफ कलाल (26),शादाब शेख (25) या पाचजणांना अटक केली आहे. तर समीर अस्लम शेख याच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शाहुपूरी पोलिसांनी अतिशय शिताफीने या टोळक्यास जेरबंद केले असून शाहुपूरी पोलिसांचे कौतुक होत आहे.सातारा विभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक समीर शेख यांना दस्तगीर कॉलनीमध्ये एक ‘बर्थ’ डे बॉयने वाढदिवसा दिवशी कोयत्याने केक कापून दहशत पसरवीली असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार ती माहिती काढुन पुढील कारवाई करण्याच्या त्यांनी शाहुपूरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर व गुन्हे प्रकटीकरण शाखेस सुचना देवुन मार्गदर्शन केले होते.

त्याप्रमाणे शाहुपुरी गुन्हे शाखेचे पथक आपल्या खास खबऱयांकडून माहीती मिळविण्याचे काम करत होते. दि. 16 रोजी शाहुपुरी पोलीस ठाण्याचे स.पो.नि. विशाल वायकर यांना बातमी मिळाली की, मंगळवारपेठ दस्तगीर कॉलनीमध्ये राहणारा एक बर्थ डे बॉय व त्याचे इतर मित्रांनी कोयते व तलवारी अशा घातक शस्त्रांचा अवैध शस्त्र साठा केला आहे. बर्थ डे बॉयने दि.10 रोजी त्याच्या वाढदिवसानिमित्त मित्रांसह दस्तगीर कॉलनीमध्ये कोयत्याने केक कापून दहशत केली आहे. अशी खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानंतर स. पो. नि. विशाल वायकर यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पथक तयार करत त्यांना कारवाईबाबत मार्गदर्शन करुन सुचना दिल्या. त्यासंदर्भात गुन्हे प्रकटीकरण शाखेने बर्थ डे बॉयचे सेलेब्रेशनचे फोटोवरुन त्याचा व त्याचे साथीदारांची ओळख पटवून घेतली. गुन्हे शाखेचे पथकाने दस्तगीर कॉलनीमध्ये अचानक छापा टाकुन त्यांना ताब्यात घेतले.

पोलिसांनी विचारपुस केली असता युवकांनी खरी माहिती देण्यास टाळले. तरीदेखील गुन्हे प्रकटीकरण शाखेने त्या युवकांवर सलग प्रश्नांची सरबत्ती करुन अत्यंत कौशल्याने चौकशी केली असता त्या युवकांनी सातारा शहरात दहशत पसरविण्यासाठी त्यांच्याजवळ 4 मोठे कोयते व 1 तलवार असा घातक शस्त्रांचा साठा घराजवळ केल्याची कबुली दिली. ती शस्त्र जप्त करत पाचही आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्यासह त्यांचा एक फरारी साथीदार यांच्याविरुद्ध शाहुपुरी पोलीस ठाण्यात भारतीय शस्त्र अधिनियम ( आर्म ऍक्ट ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्हयाचा अधिक तपास पो.हेड कॉ. सुनिल मोहरे हे करीत आहेत.

Read More  महाराष्ट्राला आणि पर्यावरणाला वाचवायला माळकरी आणि वारकरीच पुरेसे -अभिनेते सयाजी शिंदे

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,440FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या