24.2 C
Latur
Tuesday, July 5, 2022
Homeमहाराष्ट्रनवी मुंबईत ५ गाड्यांचा विचित्र अपघात, एकाचा मृत्यू

नवी मुंबईत ५ गाड्यांचा विचित्र अपघात, एकाचा मृत्यू

एकमत ऑनलाईन

मुंबई : नवी मुंबईत रविवारी (१९ जून) झालेल्या दोन अपघातांमुळे शीव पनवेल महामार्गावर खारघर ते कळंबोलीपर्यंत प्रचंड वाहतूक कोंडी झाली. यात कामोठे येथे ५ गाड्यांच्या विचित्र अपघातात एकाचा मृत्यू झाला, तर पाच ते सहा जण जखमी झाले आहेत. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

नवी मुंबई कामोठे उड्डाणपुलावर रविवारी सकाळी आठच्या सुमारास एक विचित्र अपघात घडला. उड्डाणपुलावर बंद पडलेल्या ट्रकचे काम सुरू होते. त्याच वेळी मागून भरधाव येणा-या व्हॅगन आर गाडी, इनोवा, एक ट्रक आणि एसटी महामंडळाची शिवनेरी बस एकमेकांवर धडकल्या. त्यात व्हॅगन आरमधील एका व्यक्तीचा मृत्यू झाला.

कारमधील इतर सहप्रवासी व इनोव्हामधील प्रवासी असे तीन ते चार जण जखमी झाले आहेत. या जखमींवर जवळच्या एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. व्हॅगन आरमधील जखमींना बाहेर काढता न आल्याने शेवटी गॅस कट्टरने गाडीचा मोठा भाग कापून प्रवाशांना बाहेर काढावं लागलं.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या