27 C
Latur
Thursday, August 18, 2022
Homeमहाराष्ट्रसत्तेच्या लालसेपोटी महाराष्ट्राला अस्थिर करण्याचे पाप भाजपाने केले

सत्तेच्या लालसेपोटी महाराष्ट्राला अस्थिर करण्याचे पाप भाजपाने केले

एकमत ऑनलाईन

मुंबई : विधान परिषदेच्या निकालानंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलंच तापले आहे. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी आमदारांना घेऊन सेनेविरोधात बंड पुकारलं. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर महाविकास आघाडी सरकार कोसळले. भाजपाच्या मदतीने राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी शपथ घेतील आणि पुन्हा एकदा भाजप शिवसेना वाद उफाळून आला. दरम्यान, आता काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी भाजप आणि फडणवीस-शिंदे सरकारवर निशाणा साधला आहे. यासंदर्भात त्यांनी एक ट्वीट केलं आहे.

ट्वीटमध्ये सावंत म्हणतात, ११ दिवसांनंतरही मंत्रीमंडळ विस्तार होऊ नये हे दुर्दैव आहे. सत्तेच्या लालसेपोटी महाराष्ट्राला अस्थिर करण्याचे पाप भाजपाने केले. अजूनही अस्थिरता संपली नाही. जाहीर करुनही इंधन दर कमी करता आले नाहीत पण गेल्या सरकारचे निर्णय रद्द केले.

यांचे जनतेपेक्षा स्वत:च्या भवितव्याकडे लक्ष आहे, असा आरोप त्यांनी केला आहे.
दरम्यान, शिवसेनेच्या १६ आमदारांच्या अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्षांनी कोणताही निर्णय घेऊ नये, असा आदेश सुप्रीम कोर्टानं आजहे प्रकरण संविधानिकदृष्ट्या महत्वाचं आहे, त्यामुळं त्यावर तातडीनं सुनावणी होऊ शकत नाही.

उद्याही याबाबत सुनावणी होण्याची शक्यता नाही. त्याचबरोबर जोपर्यंत या प्रकरणाची सुनावणी होत नाही, तोपर्यंत विधानसभा अध्यक्षांनी आमदारांच्या अपात्रते संदर्भात निर्णय घेऊ नये असं कोर्टानं आज सांगितलं.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या