पुणे : एकीकडे मनसेने भाजपला पाठिंबा दिला असला आणि प्रचारात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला असला तरीदेखील कॉंग्रेसचे उमेदवार आणि भाजपचे नेते मनसेच्या स्थानिक नेत्यांची भेट घेताना दिसत आहे. काँग्रेसचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांची प्रचार यात्रा थेट मनसेच्या कार्यालयात धडकली होती. तर भाजप नेते चंद्रकांत पाटलांंनी कसब्याचे मनसेचे कसबा विभाग अध्यक्ष गणेश भोकरे यांनी भेट घेतली आहे.
एरवी मनसे पक्षाला फारसे महत्व न देणारे पक्षही कसबा पोटनिवडणुकीसाठी मनसेची मनधरणी करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. पुण्यातील कसबा मतदार संघाच्या निवडणुकीत मोठे ट्विस्ट बघायला मिळत आहे. त्यात महाविकास आघाडीचे उमेदवार रंविद्र धंगेकरांची प्रचारयात्रा थेट मनसेच्या कार्यालयात धडकली होती. त्यांनंतर मनसैनिकांनी महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र्र्र धंगेकरांचे जय्यत स्वागत केले. मनसेने महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या केलेल्या स्वागताची चांगलीच चर्चा झाली. अनेक तर्कवितर्क लावण्यात आहे.
धंगेकरांच्या स्वागतानंतर मनसेकडून स्पष्टीकरण
प्रसिद्धीपत्रात लिहिले आहे की, काल पुणे मनसे शहर कार्यालयात कोअर कमिटीची साप्ताहिक बैठक चालू होती. दर गुरुवारी नियमित ही बैठक असते. त्यावेळी समोरून महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांची पदयात्रा चालू होती. त्यादरम्यान ते आणि महाविकास आघाडीचे नेते कार्यकर्ते अचानक थेट मनसे कार्यालयात आले. घरात आलेल्या व्यक्तीला भेटणे आणि त्याच्याशी बोलणे ही आपली संस्कृती आहे. त्याप्रमाणे दोन मिनिटात ते भेट घेऊन बाहेर पडले. पण यासंदर्भात संभ्रम निर्माण होणा-या बातम्या काही ठिकाणी प्रसिद्ध झाल्या आहेत.