26.1 C
Latur
Sunday, September 19, 2021
Homeमहाराष्ट्रपांडुरंग रायकर यांच्या कुटुंबियांना भाजपाकडून पाच लाखाची मदत !

पांडुरंग रायकर यांच्या कुटुंबियांना भाजपाकडून पाच लाखाची मदत !

एकमत ऑनलाईन

मुंबई,दि.२ (प्रतिनिधी) पुण्यातील पत्रकार पांडुरंग रायकर यांचा वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे झालेला मृत्यू धक्कादायक आहे. त्यांच्या कुटुंबियांना भारतीय जनता पार्टीच्या आपदा कोषातर्फे पाच लाख रुपये मदत देण्यात येईल, असे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी बुधवारी सांगितले.

कोरोनाच्या साथीत पोलीस, डॉक्टर, नर्सेस, सफाई कर्मचारी इत्यादी कोरोना वॉरिअर्सप्रमाणेच पत्रकारांचेही काम महत्त्वाचे आहे. दुर्दैवाने पत्रकारांना राज्य सरकारकडून मदत होत नाही. पत्रकारांनाही ५० लाख रुपयांचे विमा कवच देण्याची मागणी आपण राज्य सरकारकडे करतो. तसेच भाजपातर्फे पांडुरंग रायकर यांच्या कुटुंबियांना पाच लाख रुपये मदत देण्यात येईल असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

पत्रकार पांडुरंग रायकर यांचे कोरोनाची बाधा झाल्यानंतर वेळेवर रुग्णालयात दाखल करण्याबाबत परवड झाली. त्यांना रुग्णालयात हलविण्यासाठी खूप प्रयत्न करूनही योग्य रुग्णवाहिका वेळेत मिळाली नाही, ही घडामोड मन सुन्न करणारी आहे. त्यांची प्रकृती खालावत असल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात हलवावे यासाठी पुण्यातील अनेक पत्रकारांनी प्रयत्न केले पण यश आले नाही. अशी हतबलता पुण्यात अनेक नागरिकांना अनुभवावी लागत आहे, हे दुर्दैव आहे. कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी राज्य सरकारने पुरेशी यंत्रणा उभारली नाही, हेच यातून स्पष्ट होते.

कोरोनाची तपासणी करणे किंवा लागण झालेल्या रुग्णांवर उपचार करणे याबाबतीत राज्यामध्ये सर्व अधिकार हे राज्य सरकारकडे एकवटले आहेत. सरकारी यंत्रणेने पूर्ण एकजुटीने प्रयत्न करून रुग्णांवर वेळीच उपचार होतील, याची दक्षता घेणे गरजेचे आहे. पुण्यामध्ये कोरोनारुग्णांना हॉस्पिटलमध्ये बेड मिळत नाहीत अशा वाढत्या तक्रारी येत आहेत. जम्बो फॅसिलिटी उभारली तरी तेथे पुरेसे मनुष्यबळ असणे आणि प्रभावी उपचार होणेही गरजेचे असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

परिचारीकांचे क्वारंटाईन सुट्टीसाठी आंदोलन सुरुच

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
196FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या