31.3 C
Latur
Saturday, May 8, 2021
Homeमहाराष्ट्रनाशिकमध्ये भाजपला खिंडार

नाशिकमध्ये भाजपला खिंडार

एकमत ऑनलाईन

नाशिक : नाशिकमध्ये भाजपला खिंडार पडले आहे. माजी आमदार वसंत गिते आणि माजी प्रदेश उपाध्यक्ष सुनील बागुल भाजपच्या या दोन मोठ्या नेत्यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीत गिते आणि बागुल यांनी शिवसेनेत प्रवेश केला. वसंत गिते आणि सुनील बागुल आज संध्याकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याचे संजय राऊत यांनी नाशिकमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.

वसंत गिते आणि सुनील बागुल हे पूर्वाश्रमीचे शिवसैनिक आणि सध्या भाजपमध्ये होते. त्यामुळे आज शिवसेनेत प्रवेश करुन त्यांनी घरवापसी केली आहे. त्यांच्या प्रवेशामुळे नाशिकमध्ये शिवसेनेची ताकद वाढणार आहे. महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर होत असलेलं हे पक्षांतर म्हणजे भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

दोघेही भाजपवर नाराज
काही दिवसांपूर्वीच वसंत गिते यांनी सर्वपक्षीय समर्थकांना मिसळ पार्टी देऊन शक्तिप्रदर्शन केले होते. वसंत गिते आणि सुनील बागुल भाजपमध्ये दुर्लक्षित झाले होते. नव्या कार्यकारिणीत दोघांना पदावरुन हटवण्यात आले होते़

सरकार लोकभावनेवर चालते : राऊत
औरंगाबाद शहराच्या नामांतराच्या मुद्द्यावरुन सध्या महाविकास आघाडी सरकारमध्ये बराच खले सुरु आहे. मुख्यमंत्री कार्यालयाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन अनेकदा औरंगाबाद शहराच्या नावाचा उल्लेख संभाजीनगर असा करण्यात आला. यावर भाष्य करताना सरकार हे मुख्यमंत्र्यांच्या नावाने, लोकभावनेवर चालते असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. नाशिकमध्ये पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

पत्रकारांनी राऊत यांना प्रश्न विचारताना सरकारी ट्विटरवर औरंगाबादचे नाव संभाजीनगर असे वापरण्यात आलेआहे. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिवसेनेनं सरकारी यंत्रणेचा असा उपयोग करु नये, काय लिहायचे असेल ते सामनामध्ये लिहावे असे म्हटल्याचे सांगितले़यावर उत्तर देताना राऊत यांनी मुख्यमंत्र्यांची भूमिका योग्य असल्याचे म्हटले. राऊत म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी जी भूमिका घेतली ती योग्य आहे. सरकार हे मुख्यमंत्र्यांच्या नावाने चालते आणि सरकारने संभाजी महाराजांचे नाव वापरणे हा गुन्हा आहे का? छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी राजे यांचे नाव सरकारी कागदपत्रांवर किंवा ट्विटरवर वापरणे हा गुन्हा आहे असं मला असं वाटत नाही, शेवटी सरकार हे लोकभावनेवर चालते

लखवीला १५ वर्षांचा तुरुंगवास

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,493FansLike
182FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या