22.7 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeमहाराष्ट्रभाजपला सत्तेपासून दूर ठेवावं लागेल

भाजपला सत्तेपासून दूर ठेवावं लागेल

एकमत ऑनलाईन

नवी मुंबई : सोनिया गांधी यांना सक्तवसुली संचालनालयाची (ईडी) नोटीस देऊन छळ करत आहात असा आरोप महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी मोदी सरकारवर केला. नवी मुंबई येथे आज रविवारी (ता. १२) ओबीसी मंथन शिबिर होत आहे. त्यावेळी थोरात बोलत होते.

पुरोगामीचा, समतेचा आणि जो राज्यघटनेचा विचार आहे ज्यांनी आपल्याला हक्क दिले, ज्यांनी आपल्याला राजकारणात स्थान दिले. ही जी राज्यघटना आहे, ती जर वाचवायची असेल तर भारतीय जनता पक्षाला सत्तेपासून दूर ठेवल्याशिवाय दुसरा पर्याय नाही हे आपण लक्षात ठेवले पाहिजे.

तुमच्या-आमच्या हक्कांवर गदा येण्याची शक्यता आहे. सोनिया गांधी, राहुल गांधी आपल्याकरिता काम करतात. त्यांना आता ईडीच्या नोटिसा आल्या आहेत. तुम्ही या माऊलीचा छळ करत आहात. तुम्हाला ही जनता शिक्षा केल्याशिवाय राहणार नाही, या शब्दांत बाळासाहेब थोरात यांनी मोदी सरकारला बजावले. पुढच्या पिढीचा आपल्याला विचार करावा लागेल.

संतांनी समतेचा विचार मांडला. हाच समतेचा विचार आपल्याला पुढे न्यायचा आहे. संत चोखामेळा, संत जनाबाई, संत गोरोबा काका यांनी समतेचा विचार मांडल्याचे बाळासाहेब थोरात म्हणाले.
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली. त्यांचे जे मावळे होते ते सर्व समाजातील होते.

सर्व समाजांचा हा महाराष्ट्र बनला आहे. ही परंपरा आपल्याला पुढे न्यायची असल्याचे उपस्थित पदाधिका-यांना सांगितले. महाराष्ट्रात काँग्रेसला पुढे कसे न्यायचे हा विचार करा. भाजपला सत्तेपासून दूर ठेवायचे आहे. नाही तर देश उद्ध्वस्त होईल. पक्षाची संघटना कशी मजबूत होईल याचाही विचार करा,असे आवाहन बाळासाहेब थोरात यांनी केले.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या