21.2 C
Latur
Friday, October 7, 2022
Homeमहाराष्ट्रभाजपा मित्रपक्षांचा वापर करून त्यांना संपतोय

भाजपा मित्रपक्षांचा वापर करून त्यांना संपतोय

एकमत ऑनलाईन

मुंबई : ‘भाजपा छोट्या पक्षांचा वापर करून त्यांना संपवण्याचे काम करते, अशी परिस्थिती जेडीयूची होऊ नये, म्हणून नितीशकुमार यांनी सरकारमधून बाहेर पडायचा निर्णय घेतला असावा.’, असे ते म्हणाले.

बिहारमध्ये भाजपाशी असलेला वाद शिगेला पोहोचल्यानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राजीनामा देत भाजपाशी असलेली युती तोडली आहे. यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

‘नितीशकुमार हे मुरलेले नेते आहे. बिहारमध्ये पासवान यांचा पक्ष भाजपासमवेत होता. पंजाबमध्ये शिरोमणी अकाली दर, महाराष्ट्रात शिवसेना आणि महादेव जानकार यांचा पक्ष या सर्वांचे काय झाले हे सर्वांनाच माहिती आहे. भाजपा छोट्या पक्षांचा वापर करून त्यांना संपवण्याचं काम करते, अशी परिस्थिती जेडीयूची होऊ नये, म्हणून नितीशकुमार यांनी सरकारमधून बाहेर पडायचा निर्णय घेतला असावा. ’, अशी प्रतिक्रिया रोहीत पवार यांनी दिली आहे.

बच्चू कडूंनाही खोचक टोला
बरेच दिवस बच्चू कडू हे शिंदे गटाबरोबर होते. ते गुवाहाटीलाही गेले होते. शिंदे गटाशी त्यांचे जवळचे संबंध असून ते त्यांना चांगल्या प्रकारे ओळखतात. त्यामुळे कालचा विस्तार बघितल्यानंतर त्यांना ‘हे धोका देणा-यांचे राज्य’ अशा अंदाज आला असेल. तसेच जे महादेव जानकर यांच्या पक्षासोबत झालं ते प्रहारबरोबर होऊ नये, अशी चिंताही त्यांच्या मनात असेल’’, असा खोचक टोला रोहित पवार यांनी आमदार बच्चू कडू यांना लगावला आहे.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या