22.2 C
Latur
Friday, August 19, 2022
Homeमहाराष्ट्रविधानसभा अध्यक्षपदासाठी भाजपकडून राहुल नार्वेकरांना उमेदवारी

विधानसभा अध्यक्षपदासाठी भाजपकडून राहुल नार्वेकरांना उमेदवारी

एकमत ऑनलाईन

मुंबई : जवळपास दहा दिवसांच्या हायव्होल्टेज राजकीय ड्राम्यानंतर अखेर शिवसेनेचा शिंदे गट आणि भाजपने राज्यात सरकार स्थापन केले आहे. त्यानंतर आता नव्या सरकारमध्ये विधानसभा अध्यक्षपदाची नियुक्ती होणार आहे. विधानसभेचे अध्यक्षपद भाजपकडे असणार असून त्यासाठी पक्षाने आमदार राहुल नार्वेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून त्यानुसार, महाराष्ट्र विधीमंडळाचे ३ आणि ४ जुलै रोजी विशेष अधिवेशन पार पडणार आहे. दरम्यान, २ जुलै रोजी विधानसभा अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरता येणार आहे. त्यानंतर ३ जुलै रोजी अध्यक्षपदाची निवडणूक पार पडेल. त्यानंतर ४ जुलै रोजी बहुमत चाचणी पार पडेल. दरम्यान, भाजपकडून राधाकृष्ण विखे पाटील यांना विधानसभा अध्यक्षपदासाठी उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जात होती. विखे हे काँग्रेसमधून भाजपत दाखल झाले आहेत. या उमेदवारीद्वारे त्यांचे राजकीय पुनर्वसन होऊ शकते, अशी चर्चा होती.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या