24.7 C
Latur
Friday, September 30, 2022
Homeमहाराष्ट्रभाजपने सरनाईक कुटुंबीयांची माफी मागावी

भाजपने सरनाईक कुटुंबीयांची माफी मागावी

एकमत ऑनलाईन

मुंबई : ईडीने खरंच क्लोजर रिपोर्ट सादर केला असेल तर भाजपने सरनाईक कुटुंबीयांची माफी मागावी, अशी मागणी राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हा अन्वेषण विभागाने टॉप सिक्युरिटी घोटाळा प्रकरणात कोर्टात क्लोजर रिपोर्ट सादर केला. आता ईडीदेखील याच अहवालाच्या आधारे क्लोजर रिपोर्ट सादर करणार असल्याची चर्चा सुरू आहे. दरम्यान, सुप्रिया सुळे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करत भाजपने सरनाईक कुटुंबीयांची माफी मागावी अशी मागणी केली आहे.

जर ईडीने खरंच क्लोजर रिपोर्ट सादर केला असेल तर भाजपने सरनाईक कुटुंबीयांची माफी मागावी. ईडीच्या क्लोजर रिपोर्टनुसार खरंच सरनाईक कुटुंबीय निर्दोष असेल तर भाजपने जाहीर माफी मागावी कारण या प्रकरणाची क्रोनोलॉजी समजून घेतली तर ही उघड उघड ब्लॅकमेलिंग होते हे दिसते आहे, अशी टीका सुळे यांनी केली.

तसेच, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या बारामती दौ-यावरही पुन्हा भाष्य केले. मी पहिलेच सांगितले की, अर्थमंत्री सीतारामन यांचे बारामती मतदारसंघात स्वागतच आहे. कसे आहे हे, ज्या झाडाला आंबे त्याच झाडाला लोक दगड मारतात म्हणूनच सातत्याने बारामती टार्गेट होत आहे. पण जनता सुजाण आहे. भाजपचा हा खडखडाट बारामतीकरांना चांगला समजतोय. आम्ही आपली विकासाची कामे सुरूच ठेवणार, असा टोलाही सुळे यांनी भाजपला लगावला.

प्रताप सरनाईक यांचे काय आहे प्रकरण?
प्रताप सरनाईक यांच्याविरोधात एमएमआरडीए टॉप्स सुरक्षा भरती प्रकरणी सखोल चौकशी करण्यात आली मात्र त्यात कोणताही घोटाळा झाला नसून या प्रकरणात कोणताही गुन्हा घडला असं निदर्शनास आले नाही. त्यामुळे या प्रकरणाचा तपास बंद करत असून तसा अहवाल आम्ही न्यायालयात सादर करतोय, तो न्यायालयाने मान्य करावा असे पत्र इओडब्ल्यूने कोर्टात दिले होते. ते बुधवारी कोर्टाने मान्य करत तपास बंद करण्यास ईओडब्ल्यूला परवानगी दिली आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या