22.8 C
Latur
Thursday, July 7, 2022
Homeमहाराष्ट्रराष्ट्रपतिपदासाठी भाजपने शरद पवारांना उमेदवारी द्यावी

राष्ट्रपतिपदासाठी भाजपने शरद पवारांना उमेदवारी द्यावी

एकमत ऑनलाईन

मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाने भारताच्या सर्वोच्च घटनात्मक पदासाठी म्हणजे राष्ट्रपतिपदासाठीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार १८ जुलै रोजी राष्ट्रपतिपदासाठी मतदान होईल व २१ जुलै रोजी दिल्लीत निकाल जाहीर करण्यात येतील.

देशाचे मुख्य निवडणूक आयुक् त राजीव कुमार यांनी दिल्लीत राष्ट्रपतिपदाच्या निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केली. यानंतर शरद पवार यांना राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी देण्याची मागणी होत आहे. शिवसेनेच्यावतीने संजय राऊत यांनीही शरद पवार यांच्या नावाला पाठिंबा दिला आहे.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ २४ जुलै रोजी संपत आहे. त्यापूर्वी, सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश नवनिर्वाचित राष्ट्रपतींना पद व गोपनीयतेची शपथ देतील. राष्ट्रपतिपदासाठी सर्वसामान्यांना मतदानाचा अधिकार नसतो. केवळ विधानसभा व लोकसभा-राज्यसभेवर निवडून आलेले लोकप्रतिनिधीच या निवडणुकीत मतदान करू शकतात.

त्यांच्या मतांचे मूल्य विजयी उमेदवार ठरवतो. सध्या आकड्यांचे समीकरण पाहता भाजपचे पारडे जड आहे. भाजपने दिलेला उमेदवार राष्ट्रपतिपदावर बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपने शरद पवार यांना उमेदवारी देण्याची मागणी शिवसेनेच्यावतीने संजय राऊत यांनी केली आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या