24.6 C
Latur
Monday, January 18, 2021
Home महाराष्ट्र अजान स्पर्धेच्या मुददयावरून भाजपाची शिवसेनेवर जोरदार टीका!

अजान स्पर्धेच्या मुददयावरून भाजपाची शिवसेनेवर जोरदार टीका!

एकमत ऑनलाईन

मुंबई,दि.३०(प्रतिनिधी) शिवसेनेचे दक्षिण मुंबई विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ यांनी अजान पठण स्पर्धा आयोजित केल्यामुळे भाजपने पुन्हा एकदा शिवसेनेला हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून टार्गेट केले आहे. सत्तेसाठी शिवसेनेने मूळ आचारविचारांना तिलांजली दिल्याची टीका विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केली आहे.

पांडुरंग सकपाळ यांनी दक्षिण मुंबईत अजानपठण स्‍पर्धेचे आयोजन केले आहे.एका वहिनीला दिलेल्‍या मुलाखतीत सकपाळ यांनी, अजान ऐकल्‍यानंतर मनःशांती मिळते, असे म्हटले आहे. लहान मुलांना अजानची गोडी लागावी यासाठीच या स्‍पर्धेचे आयोजन केल्‍याचे त्‍यांनी सांगितले. भाजपाने नेमका हाच मुद्दा पकडून हिंदुत्‍वावरून शिवसेनेला पुन्हा एकदा लक्ष्य केले आहे. विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली. अजानमुळे मनःशांती मिळते असे वक्‍तव्य सकपाळ यांनी केले आहे.त्‍यावर सकपाळ यांचे विधान हे सत्‍तेनंतर बदललेल्‍या शिवसेनेचे स्‍वरूप स्‍पष्‍ट करणारे आहे.सत्‍ता टिकविण्यासाठी शिवसेनेने मूळ आचारविचार यांना तिलांजली देणारी वाटचाल सुरू केली आहे.कहर म्‍हणजे वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचाच दाखला त्‍यांनी दिल्‍याची टीका विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केली आहे.

सत्तेसाठी शिवसेनेचं स्वरुप बदलत आहे. शिवसेनाप्रमुख प्रत्येक धर्म प्यारा असे बोलले असतील, परंतु त्यांनी कधी त्यांची पालखी उचला असं सांगितलं नाही. शिवसेनाप्रमुखांनी नेहमी त्यांच्या आचार विचारावर टीका केली. पण सत्तेच्या नादात मानवतेचा उल्लेख करून हिंदुत्वाची भूमिका सरमिसळ झाल्याचे सकपाळ यांच्या वक्तव्यातून स्पष्ट होते. तसेच मातोश्रीत नमाज पढल्याचा उल्लेख हे मोठे विधान आहे, असेही दरेकर यांनी सांगितले.

शाहरूख,सलमान यांनीही धर्मांतर केले समजावे काय ? नवाब मलिक यांचा सवाल
देशात कलेला किंवा अभिनयाला धार्मिक चष्‍म्‍यातून पाहणे योग्‍य नाही.मात्र भाजपाला धर्माचा चष्‍मा लावल्‍याशिवाय जमत नाही.दिलीपकुमार,शाहरूख खान,सलमान खान यांनी चित्रपटांत मंदिरांत जाउन सीन केले आहेत.याचा अर्थ त्‍यांनी धर्मांतर केले असा होत नाही असा टोला अल्‍पसंख्यांक विकास मंत्री नवाब मलिक यांनी लगावला आहे.

शिवसेनेचे दक्षिणमुंबई विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ यांनी लहान मुलांसाठी अजानपठणाची स्‍पर्धा आयोजित केली आहे.त्‍यावरून भाजपने शिवसेनेला लक्ष्य केले आहे.भाजपाच्या टीकेला नवाब मलिक यांनी प्रत्‍युत्‍तर दिले आहे.चित्रपटांत दिलीप कुमार,शाहरूख खान,सलमान खान यांनी मंदिरांतील सीन केले आहेत.याचा अर्थ त्‍यांनी लगेचच धर्मांतर केले असा कोणी घेत नाही.सोलापूर असेल वा राज्‍यातील इतर जिल्‍हयांमध्ये गीतापठणाच्या कार्यक्रमांत मुस्‍लिम मुलींनी पहिला क्रमांक पटकावला होता ही देखील सत्‍य आहे याची नोंद भाजपाने घेतली पाहिजे. कला असेल किंवा अभिनय याकडे धार्मिक चष्‍मयातून पाहिले जाउ नये.पण भाजपाला प्रत्‍येक गोष्‍टीत धार्मिक चष्‍मयातून पाहिल्‍या शिवाय जमत नाही असा टोलाही मलिक यांनी लगावला आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,409FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या