26.2 C
Latur
Thursday, August 11, 2022
Homeमहाराष्ट्रसेनेच्या वादात भाजपची एन्ट्री!

सेनेच्या वादात भाजपची एन्ट्री!

एकमत ऑनलाईन

मुंबई : शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारले आहे. या बंडाशी भाजपचा कोणताही संबंध नाही, असे वारंवार सांगितले जात आहे. पण आता भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बंडखोर आमदारांशी व्हीडीओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा केल्याची माहिती सूत्रांनी दिलीे.

एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यापासून भाजपने अत्यंत सावध आणि शांत अशी भूमिका घेतली होती. एकनाथ शिंदे यांच्या बंडामागे भाजपचा हात असल्याचा दावा सत्ताधा-यांनी केला. पण भाजपने वारंवार हात झटकले. मात्र, आता गुवाहाटीत मुक्कामी असलेल्या बंडखोर आमदारांशी देवेंद्र फडणवीस यांनी व्हीडीओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा केल्याची माहिती समोर आली आहे. त्यांना विश्वास देण्यासाठी संवाद साधल्याची सूत्रांची माहिती आहे. शनिवारी रात्री जवळपास १५ आमदार फडणवीस यांच्याशी बोलले असल्याचे समोर आले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या