24 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeमहाराष्ट्रमंत्रिमंडळ विस्तारात भाजपचा अडथळा

मंत्रिमंडळ विस्तारात भाजपचा अडथळा

एकमत ऑनलाईन

मुंबई : मंत्रिमंडळात स्थान न मिळालेल्या नाराजांना १५ सप्टेंबरपर्यंत मंत्री करण्याचा शब्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या गटातील आमदारांना दिला खरा; पण दुस-या टप्प्यातील विस्ताराला ऑक्टोबर महिना उजाडण्याची शक्यता आहे. त्यामुळे नाराजी उघडपणे दिसण्याची भीती आहे. दरम्यान, भाजपमुळेच नव्याने विस्तार होण्यात अडचणी असल्याकडे शिंदे गटाचे आमदार बोट दाखवत आहे.

शिंदे फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर ३८ दिवसांनी मंत्र्यांचा शपथविधी झाला. त्यात शिंदे गटातील काही आमदारांच्या नावावर फुली मारली गेल्याने अपक्षांसह बंडखोरांत धुसफूस असल्याचे दिसून आले. भाजपमध्येही फारशी वेगळी स्थिती नाही. या विस्तारानंतर नाराजांची समजूत काढताना १५ सप्टेंबरपर्यंत विस्तार करण्याचे सूतोवाच शिंदे गटातील वरिष्ठ नेत्यांनी केले होते. आपल्याकडील नाराजांना शब्द दिल्याप्रमाणे विस्तार करण्याची शिंदे गटाची तयारी असल्याचे बोलले जात असले, तरी भाजपकडून मात्र, अद्याप होकार मिळाला नसल्याचे सांगण्यात येत आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या