30.2 C
Latur
Wednesday, March 3, 2021
Home महाराष्ट्र भाजपाच्या प्रसाद लाड यांनी घेतली राज ठाकरेंची भेट !

भाजपाच्या प्रसाद लाड यांनी घेतली राज ठाकरेंची भेट !

एकमत ऑनलाईन

मुंबई,दि.२३ (प्रतिनिधी) भाजपाचे नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय प्रसाद लाड यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्‍यांच्या कृष्‍णकुंज या निवासस्‍थानी जाऊन भेट घेतली.मुंबई महापालिका निवडणूका जवळ येत असताना भाजपा नेत्‍याने राज ठाकरेंची भेट घेतल्‍याने राजकीय वर्तुळात भुवया उंचावल्‍या गेल्‍या आहेत.ही भेट वैयक्‍तिक स्‍वरूपाची होती असे लाड यांनी स्‍पष्‍ट केले असले तरी याबाबत राजकीय चर्चा सुरू झाली आहे.

प्रसाद लाड यांनी कृष्‍णकुंज या निवासस्‍थनी जाउन राज ठाकरे यांची भेट घेतली.विशेष म्‍हणजे राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांनी प्रसाद लाड यांचे स्‍वागत केले.अर्धा ते पाउण तास दोघांमध्ये ही भेट झाली.भेटीचा नेमका तपशील उघड करण्यात आला नसला तरी मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या भेटीला महत्‍व आले आहे.भेटीनंतर प्रसाद लाड यांनी आपले व राज ठाकरे यांचे वैयक्‍तिक संबंध आहेत.ही भेट वैयक्‍तिक होती असे स्‍पष्‍ट केले मात्र भाजपाचा निर्धार,मुंबई पालिकेवर भाजपाचा झेंडा अशी सूचक प्रतिक्रियाही दिली.

आगामी मुंबई महापालिकेची निवडणूक कोणत्‍याही परिस्‍थितीत जिंकायचीच आणि इतकी वर्षे असलेली शिवसेनेची सत्‍ता खेचायची असा निर्धार भाजपाने केला आहे.मुंबई महापालिका जर महाविकास आघाडीने एकत्रित लढवली तर मनसेला सोबत घेता येउ शकते का याची चाचपणी भाजपाने सुरू केली आहे.मनसेचा मराठीचा मुददा भाजपासाठी अडचणीचा ठरू शकतो.मात्र शिवसेनेला अडचणीत आणण्यासाठी जे काही प्रयत्‍न करता येतील ते भाजपा करणार आहे.

तामसा येथे १६ क्विंटल गोमांस जप्त

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,438FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या