35 C
Latur
Saturday, April 17, 2021
Homeमहाराष्ट्रभाजपाच्या मंदिर आंदोलनात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

भाजपाच्या मंदिर आंदोलनात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

मंबईत सिद्धी विनायकमंदीराबाहेर आंदोलन; पोलीसांशी झटापट

एकमत ऑनलाईन

मंबई :भाजपाने मंदिरे उघडण्यासाठी राज्यव्यापी आंदोलन पुकारले आहे. मात्र अनेक ठिकाणी आंदोलनात सोशल डिस्टिन्सिंगचा फज्जा उडाल्याचे दिसून आले. मुंबईतील सिद्धिविनायक मंदिराबाहेर जे आंदोलन झाले त्यामध्ये सोशल डिस्टन्सिगचा नव्हते. भाजपाचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले. भाजपाच्या कार्यकर्त्यांनी हातात गणपतीची मूर्ती आणली होती. या मूर्तीची आरती करण्यात आली आणि भाजपा कार्यकर्त्यांनी मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला.

मात्र पोलिसांनी त्यांना अडवले आणि ताब्यात घेतले. काही वेळासाठी वातावरण तणावाचेही झाले होते. बार उघडले गेले आहेत, रेस्तराँ उघडले गेले आहेत मग मंदिरे आणि मशिदी बंद का? धर्मस्थळं बंद का? असा प्रश्न भाजपाच्या आंदोलकांनी विचारला. कोरोना आणि लॉकडाऊनमुळे मंदिरे, मशिदी, चर्च सगळे बंद आहे. अनलॉकमध्ये काही गोष्टी सुरु होत आहेत. अशात मंदिर प्रवेशालाही परवानगी द्यावी अशी मागणी करण्यात आली.

भाजपाच्या कार्यकर्त्यांनी हातात गणपतीची मूर्ती आणली होती. या मूर्तीची आरती करण्यात आली आणि भाजपा कार्यकर्त्यांनी मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्यांना अडवले आणि ताब्यात घेतले. काही वेळासाठी वातावरण तणावाचेही झाले होते. फक्त मुंबईतच नाही तर राज्यभरातली मंदिरे खुली करण्यासाठी आंदोलन करण्यात येत आहे. मुंबईतल्या सिद्धिविनायक मंदिराबाहेर भाजपा कार्यकर्ते आणि पोलीस यांच्यात काहीशी झटापटही झाली. या संपूर्ण आंदोलनात सोशल डिस्टन्सिंगचा पार फज्जा उडाल्याचे पाहण्यास मिळाले.

मुख्यमंत्री एकाच वेळी दोन वक्तव्ये करतात : दरेकर
मुख्यमंत्री एका वेळी दोन वक्तव्ये करतात. आधी सांगायचे तुम्ही खबरदारी घ्या आम्ही जबाबदारी घेतो. आता माझे कुटुंब माझी जबाबदारी म्हणत जनतेवर जबाबदारी का टाकत आहात? तुम्ही सक्षम नाही म्हणून माझं कुटुंब माझी जबाबदारी म्हणता. तुमची घोषणा माझं सरकार माझी जबाबदारी अशी का नाही? असा प्रश्न प्रवीण दरेकर यांनी विचारला.

राज्यातील मंदिरे खुली करा; भाजपाचे विठ्ठल मंदिरासमोर आंदोलन

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,476FansLike
168FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या