24.2 C
Latur
Tuesday, July 5, 2022
Homeमहाराष्ट्रशेअर बाजारात ब्लॅक मंडे

शेअर बाजारात ब्लॅक मंडे

एकमत ऑनलाईन

मुंबई : भारतीय शेअर बाजारासाठी आजचा दिवस ख-या अर्थाने ब्लॅक मंडे ठरला असून बाजारात सोमवारी मोठी घसरण झाल्याचे दिसून आले. आज एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे ७ लाख कोटी रुपये पाण्यात गेले आहेत. दलाल स्ट्रीटवर सेन्सेक्समध्ये आज जवळपास ३ टक्क्यांची घसरण झाली. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांसाठी हा मोठा धक्का आहे.

सोमवारी सकाळी १०:२० वाजता बीएसई सेन्सेक्स २.८३ टक्क्यांनी खाली येत ५२,७६५.०९ नजीक व्यवहार करत होता. सेन्सेक्समधील सर्व ३० समभाग मूल्य घसरणीचा प्रवास करत होते. पैकी ५ समभाग ४ टक्क्यांपेक्षा जास्त आपटले. बजाज फिनसर्व्ह, बजाज फायनान्स आणि आयसीआयसीआय बँक सर्वाधिक घसरले.

बीएसई मिडकॅप २.३३ टक्क्यांनी घसरत २१,९६६.१७ वर व्यवहार करत होता, तर स्मॉलकॅप निर्देशांक २.४८% ने घसरून २५,२१७.२३ वर होता. शेअर बाजारातील वातावरण कमालीचे अस्वस्थ असूनही फ्युचर समुहातील फ्युचर रिटेल, फ्युचर कंझ्युमर आणि फ्युचर एंटरप्रायझेसचे शेअर मात्र ४.५ टक्क्यांपेक्षा अधिक वाढले. निफ्टी ५० निर्देशांक २.७४% ने घसरून १५,७५८.२५ वर व्यवहार करत होता. निफ्टी ५० मध्ये बजाज फिनसर्व्ह, इंडसइंड बँक आणि बजाज फायनान्स हे सुरुवातीच्या सत्रात घसरण नोंदवित होते.

डॉलरच्या तुलनेत रुपयाने तळ गाठला
डॉलरच्या तुलनेत आजही रुपयाची घसरण झाली. शुक्रवारच्या ७७.८४ रुपयाच्या तुलनेत आज रुपयाची तिमत 78.28 रुपयांवर पोहोचली. रुपयाची ही आतापर्यंतची निचांक्क पातळी आहे. त्यामुळे आता एका डॉलरसाठी ७८.२८ रुपये मोजावे लागणार आहेत. परदेशी गुंतवणूकदारांकडून सुरू असलेली विक्री आणि अमेरिकेतील महागाई दर यामुळे एका डॉलरच्या तुलनेत रुपयांची ऐतिहासिक घसरण झाली आहे.

क्रिप्टोकरन्सीतही मोठी पडझड
आज क्रिप्टोकरन्सी बाजारातही विक्रमी पडझड होऊन निर्देशांकाने नीचांकी पातळी गाठली आहे. जगभरात क्रिप्टो बाजार मूल्य ९८५.०७ बिलियन डॉलर इतके आहे. यामध्ये एका दिवसांत तब्बल ११.०८ टक्क्यांची घसरण झाली आहे. आजच्या पडझडीमुळे जागतिक क्रिप्टोकरन्सी बाजारात १ ट्रिलियन अमेरिकन डॉलर्सचे नुकसान झाले.

 

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या