24.2 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeमहाराष्ट्रसिंहासनावर आंधळा धृतराष्ट्र बसलाय

सिंहासनावर आंधळा धृतराष्ट्र बसलाय

एकमत ऑनलाईन

मुंबई : भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहीत टीकेची झोड उठवली आहे. सिंहासनावर आंधळा धृतराष्ट्र बसला असेल तर कौरवांच्या मन मर्जीने राज्य चालते असे म्हणत त्यांनी टोला लगावला आहे. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरु असून आता आरोपप्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. आठ दिवसांपूर्वी वांद्रे पश्चिममधील शास्त्रीनगरमध्ये बेकायदेशी बांधकाम कोसळले या दुर्घटनेत एकाचा जागीच मृत्यू झाला. या मुद्द्यावरून मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.

सध्या राज्याच होऊ घातलेल्या विविध निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले आहे. सध्या देशपातळीवरील राष्ट्रपती निवडणूक आणि विधान परिषदेमुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राज्यसभेनंतर अनेक नाट्यमय राजकीय घडोमोडी या निवडणुकीतही घडतील असा अंदाजही व्यक्त केला जात आहे. दरम्यान, या निवडणुकांमुळे पुन्हा एकदा भाजप-शिवसेना वाद उफाळू आला आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या